Home सामाजिक प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.3 राजारामपुरी व केंद्र क्रं.4 पंचगंगा या आरोग्य संस्था गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम अंतर्गत राज्यस्तरीय मानांकनास पात्र

प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.3 राजारामपुरी व केंद्र क्रं.4 पंचगंगा या आरोग्य संस्था गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम अंतर्गत राज्यस्तरीय मानांकनास पात्र

10 second read
0
0
6

no images were found

प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.3 राजारामपुरी व केंद्र क्रं.4 पंचगंगा या आरोग्य संस्था गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम अंतर्गत राज्यस्तरीय मानांकनास पात्र

कोल्हापूर  : शासनाकडून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयांची गुणवत्ता वाढविण्यासाठी गुणवत्ता आश्वासन पडताळणी कार्यक्रम राबविण्यात येतात. त्याअनुषंगाने सन 2025-26 व 2026-27 या वर्षात कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या 11 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम राबविला जात आहे.

या कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून प्राप्त चेकलिस्टद्वारे चार टप्प्यामध्ये मूल्यांकन केले जाते. यामध्ये प्रथमत: संस्थेकडून स्वमूल्यांकन केले जाते. त्यानंतर जिल्हा स्तरावरील टीमकडून मूल्यांकन केले जाते. त्यानंतर राज्य स्तरावरील टीमकडून मूल्यांकन केले जाते.

         महानगरपालिका अंतर्गत असणा-या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.3 राजारामपुरी व केंद्र क्रं.4 पंचगंगा या संस्थेचे सन 2025-26 व 2026-27 या वर्षात जिल्हास्तरीय मूल्यांकन पूर्ण होऊन या संस्था राज्यस्तरीय असेसमेंट होणेकरीता पात्र ठरल्या होत्या. दि.6 ते 8 ऑगस्ट 2026 कालावधीमध्ये राज्यस्तरावरून दोन सदस्यीय टीम सदर संस्थेचे मूल्यांकन करण्यासाठी आलेली होती. यामध्ये चिपळूण येथून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ज्योती जाधव व सांगली येथून आयपीएच कोऑर्डिनेटर दिप्ती धुमाळ या मूल्यांकनाकरीता आलेल्या होत्या. या टीमकडून केंद्र शासनामार्फत दिलेल्या राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाच्या चेकलिस्टनुसार मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनामध्ये 12 विभाग तपासले गेले.

या मूल्यांकनामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.3 राजारामपुरी या संस्थेला 88.40 टक्के इतके गुण तसेच प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्रं.4 पंचगंगा या संस्थेला 89.80 टक्के इतके गुण मिळाले असून राज्यस्तरीय सर्टीफिकेट मिळणेसाठी आवश्यक 5 मानांकन पूर्ण केले आहेत व सदर संस्थेला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय प्रमाणपत्र प्राप्त  झालेले आहे. तसेच या 2 आरोग्य संस्था राष्ट्रीय मूल्याकनांसाठी पात्र झाल्या आहेत.

या संस्थेला राष्ट्रीय गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय प्रमाणपत्र प्राप्त होण्यासाठी आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदशनाखाली उपायुक्त नागेंद्र मुतकेकर, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, आरसीएच ऑफिसर डॉ.अमोलकुमार माने, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या काळे, डॉ.योगिता भिसे, शहर कार्यक्रम व्यवस्थापक अमोल महाडिक, शहर लेखा व्यवस्थापक प्रताप पाटील, शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ.संदीप पाटील, गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम सहायक श्रीम.नेहा भोई, आरसीएच ऑफिस सर्व स्टाफ यांच्या नियोजनानुसार वैद्यकीय अधिकारी डॉ.योगिनी कुलकर्णी, डॉ.स्वातीप्रिया त्रिपाठी, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडील सर्व स्टाफने सहकार्याने कामकाज पाहिले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

२९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय परिषदेत ५० हून अधिक देशांतील व्यावसायिक नेते येणार एकत्र

२९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय परिषदेत ५० हून अधिक देशांतील व्यावसायिक नेते येणा…