Home शासकीय महापालिकेतर्फे स्वच्छता मोहिमेअंतर्गत आज 15 टन कचरा उठाव

महापालिकेतर्फे स्वच्छता मोहिमेअंतर्गत आज 15 टन कचरा उठाव

7 second read
0
0
117

no images were found

महापालिकेतर्फे स्वच्छता मोहिमेअंतर्गत आज 15 टन कचरा उठाव

 

कोल्हापूर( प्रतिनिधी ) : शहरामध्ये पूर ओसणा-या भागामध्ये महापालिकेच्यावतीने युध्दपातळीवर स्वच्छता व औषध फवारणी करण्यात येत आहे. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत आज 15 टन गाळ, फ्लोटींग मटेरियल व कचरा उठाव करण्यात आला आहे. हि मोहिम पंचगंगा तालीम परिसर, व्हीनस कॉर्नर, लक्ष्मी नाराण मंदिर, जयंती नाला पंपीग स्टेशन, सीता कॉलनी, नाईक मळ, कारजगे मळा, रमणमळा मळा, जाधववाडी, कदमवाडी, कुंभार गल्ली, रिलायन्स मॉल, कामगार चाळ, दुधाळी गवत मंडई, सुतारावाडा, कलेक्टर ऑफिस, बापट कॅम्प, मोकाशी पॅसेज, चावरे पॅसेज, सिध्दार्थ नगर या परिसरामध्ये राबविण्यात आली. यासाठी 5 जेसीबी, 6 आयवा डंपर, 2 फायर फायटर, 2 पाण्याचे टँकर, औषध फवारणीचे 9 टॅक्टर, पाणी फवारणीचे 2 टॅक्टर, धूर फवारणीची 9 मशिन व 20 हॅन्ड पंप, ठाणे व नवी मंबई महापालिकेचे जेटींग कम वॉटर रिसायकल मशिनच्या सहाय्याने व महापालिकेच्या 300 सफाई कर्मचा-यामार्फत राबविण्यात आली. शहरात पूर बाधीत क्षेत्रातून दोन दिवसात 55 टन गाळ, फ्लोटींग मटेरियल व कचरा उठाव करण्यात आला आहे.

       हि मोहिम प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्‍य निरिक्षक जयवंत पवार व सर्व आरोग्य निरिक्षक यांनी राबविली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …