Home राजकीय राजधानीला वेठीस धरून मोदी सरकार अस्थिर करण्याचा काँग्रेसचा डाव-हेमंत पाटील

राजधानीला वेठीस धरून मोदी सरकार अस्थिर करण्याचा काँग्रेसचा डाव-हेमंत पाटील

12 second read
0
0
6

no images were found

राजधानीला वेठीस धरून मोदी सरकार अस्थिर करण्याचा काँग्रेसचा डाव-हेमंत पाटील :  आंदोलनाच्या आडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न; देशविरोधी शक्तींना बळ मिळण्याची शक्यता 

पुणे,:- राजधानी दिल्लीला वेठीस धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष व माहिती कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी केला आहे. आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारविरोधात असंतोष निर्माण करून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न होत असेल, तर ही बाब गंभीर असून अशा परिस्थितीचा फायदा देशविरोधी शक्ती घेऊ शकतात, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

        केंद्रातील सत्ताधारी सरकारविरोधात वातावरण निर्माण करून राजकीय लाभ मिळवण्याची रणनीती विरोधकांकडून वारंवार वापरली जाते. यापूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुढे करून अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्कालीन यूपीए सरकारविरोधात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आंदोलन उभारले होते. त्या आंदोलनातून निर्माण झालेल्या राजकीय वातावरणाचा फायदा घेत नव्या राजकीय शक्ती उदयास आल्या, असे पाटील म्हणाले.

       आता कॉंक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना पुढे करून काँग्रेस मोदी सरकारविरोधात वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करण्याचा प्रत्येकाला लोकशाहीने अधिकार दिला आहे; मात्र आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्यामागील हेतूंची चिकित्सा होणे आवश्यक आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

        लोकशाहीत सरकारला विरोध करण्याचा अधिकार आहे; मात्र देशहित आणि राजकीय स्वार्थ यांतील सीमारेषा पुसली जाता कामा नये.जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना सुचविणे आणि सरकारला विधायक पर्याय देणे, ही जबाबदार विरोधकांची भूमिका असते. मात्र, केवळ सत्ताविरोधी वातावरण निर्माण करून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो लोकशाहीच्या हिताचा नाही.

      आंदोलनाच्या माध्यमातून देशाची राजधानी ठप्प करणे, शासनव्यवस्थेवर दबाव निर्माण करणे आणि राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न देशाच्या विकासप्रक्रियेवर परिणाम करू शकतात. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी लोकशाही मूल्यांचे भान राखावे, तर विरोधी पक्षांनी जनतेच्या प्रश्नांवर राजकारण करण्याऐवजी जबाबदार आणि रचनात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

२९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय परिषदेत ५० हून अधिक देशांतील व्यावसायिक नेते येणार एकत्र

२९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय परिषदेत ५० हून अधिक देशांतील व्यावसायिक नेते येणा…