10 second read
0
0
5

no images were found

नागळा पार्क मध्ये 19 ऑक्टोबरला भव्य दांडिया स्पर्धा.          कोल्हापूर (प्रतिनिधी):- महाराष्ट्र सांस्कृतिक विकास मंडळाच्या वतीने सोमवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता नागाळा पार्क येथे भव्य दांडिया सोहळ्याचे आयोजन केले आहे . गेल्या दहा वर्षापासून मंडळाच्या वतीने हा सोहळा अविरतपणे आयोजित केला जात असून यंदाही मोठ्या उत्साहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. नागाळा पार्क परिसरातील सर्वात मोठ्या आणि भव्य दांडिया सोहळ्यापैकी एक म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे .भारतीय संस्कृती आणि पारंपरिक दांडिया गरबा यांचा वारसा जपण्यासोबतच नागरिकांना सांस्कृतिक मनोरंजनाची संधी उपलब्ध करून देणे, हा या आयोजन मागील प्रमुख उद्देश आहे. गेल्या दहा वर्षापासून सातत्याने या सोहळ्याचे आयोजन करून मंडळाने परिसरातील नागरिकांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे .दरवर्षीप्रमाणे यंदा हे ही दांडिया सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी आयोजकांकडून नियोजन करण्यात येत आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र आणत सांस्कृतिक परंपरा जोपासण्यावर भर दिला जाणार आहे. नागळा पार्क परिसरातील नागरिकांसह कोल्हापूर शहरातील दांडीया आणि गरबा प्रेमींनी या भव्य सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र संस्कृती विकास मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अध्यक्ष स्वप्निल माने, उपाध्यक्ष सुरेश साळुंखे, सचिव केतन मोरे, आणि कार्यकर्ते ओंकार भोसले, मयूर मोरे, संदीप पाटील, शेखर पाटील, मयूर भोसले ,अमोल बोडके ,विनायक पाटील, ओम गुहागरकर ,विश्वेश पाटील आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

बाळासाहेब बेलेकरानी उपस्थित केला सीपीआरच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!

 बाळासाहेब बेलेकरानी उपस्थित केला सीपीआरच्या कारभारावर प्रश्नचिन्ह! कोल्हापूर  (…