no images were found
शिवाजी विद्यापीठात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात; ‘वंदे मातरम्’ पुस्तकाचे मूकवाचन
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहात सकाळी १०.३० वाजता या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “वाचाल तर वाचाल! वाचन संस्कृती जोपासूया, ज्ञानसमृद्ध समाज घडवूया” असा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.
शिवाजी विद्यापीठातील मुख्य इमारतीमध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या फोटोचे पूजन प्र-कुलगुरू प्रा. डॉ. जे. पी. जाधव आणि कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, वित्त व लेखाधिकारी सुहासिनी पाटील, डॉ. डी.बी.सुतार प्र’.संचालक ,एन.एस. एस समन्वय कबीर खराडे डॉ. शरद बनसोडे , डॉ. एम. एस देशमुख डॉ. सागर डेळेकर , डॉ. रामचंद्र पवार , डॉ. प्रिया देशमुख, डॉ. पी.बी. बिलावर, डॉ. एस.व्ही.थोरात यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती.
तदनंतर, विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये डॉ. डी.बी.सुतार यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व आणि विद्यापीठाच्या उपक्रमांची माहिती दिली. ‘वंदे मातरम्’ गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून या कार्यक्रमात श्री. मिलिंद सबनीस लिखित पुस्तकातील निवडक भागाचे मूकवाचन करण्यात आले. उपस्थित सर्वांनी या मूकवाचनात उत्स्फूर्तपणे भाग घेतला. राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) संचालक डॉ. कबीर खराडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठातील सर्व अधिविभागामार्फत ही यशस्वीरीत्या सर्वत्रपणे करण्यात आला.