Home मनोरंजन ‘यादे’च्या सेटवर आपल्या लाडक्या मित्रांसोबत वेळ घालवण्याबद्दल गुलकी जोशीचे मनोगत

‘यादे’च्या सेटवर आपल्या लाडक्या मित्रांसोबत वेळ घालवण्याबद्दल गुलकी जोशीचे मनोगत

4 second read
0
0
16

no images were found

‘यादे’च्या सेटवर आपल्या लाडक्या मित्रांसोबत वेळ घालवण्याबद्दल गुलकी जोशीचे मनोगत

 सोनी सबच्या ‘यादे’ मालिकेत सध्या एक पूर्णपणे नव्या जगाचा अनुभव पाहायला मिळत आहे, कारण डॉ. देव मेहता (इक्बाल खान) सामुदायिक सेवेसाठी किल्लारी गावात स्थलांतरित झाला आहे. या नव्या पार्श्वभूमीमुळे मालिकेला एक नवा ताजेपणा मिळाला असला, तरी सेटवर काही गोंडस छोट्या पाहुण्यांचेसुद्धा आगमन झाले आहे, जे अल्पावधीतच कलाकार आणि तांत्रिक टीमचे आवडते बनले आहेत.

अलीकडेच काही खोडकर पिल्लांनी अनपेक्षितपणे सेटवर हजेरी लावली आणि क्षणार्धात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. सेटवर इकडे-तिकडे फिरणारे हे उत्सुक छोटे पाहुणे पाहता पाहता शूटिंगच्या दिवसातील सर्वांत आनंददायी भाग बनले. शॉट्सच्या मधल्या वेळेत ही पिल्ले आनंदाने इकडे-तिकडे धावताना, कलाकार आणि तांत्रिक टीमसोबत खेळताना तसेच त्यांच्याकडे थोडेसे लक्ष देणाऱ्या प्रत्येकाजवळ जाताना दिसतात. विशेषतः गुलकी जोशी आणि इक्बाल खान यांना त्यांच्या या लाडक्या मित्रांसोबत काही अतिरिक्त क्षण घालवण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे ते अनेकदा त्यांच्या सीन्समधून थोडासा ब्रेक घेऊन या पिल्लांना प्रेमाने कुशीत घेताना दिसतात.

डॉ. सृष्टीची भूमिका साकारणारी गुलकी जोशी म्हणाली, “सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे पिल्लं सेटवर येताच आम्ही सगळे काही मिनिटांसाठी आपण काय करत होतो हेच विसरून जातो. सीन्सच्या मधल्या वेळेत मी अनेकदा त्यांना कुशीत घेते आणि त्यांच्यासोबत थोडावेळ खेळते. ती खूपच उत्सुक असतात आणि आनंदाने तुमच्या मागे फिरतात किंवा तुम्ही रिहर्सल करत असताना तुमच्या जवळ येऊन बसतात. ही खूप छोटीशी गोष्ट आहे, पण शूटिंगदरम्यानचे हे छोटे ब्रेक माझ्या सर्वात आवडत्या क्षणांपैकी एक झाले आहेत. त्यांनी किल्लारीमधील शूटिंगचे वेळापत्रक निश्चितच अधिक मजेशीर बनवले आहे.”

 डॉ. देव मेहताची भूमिका साकारणारे इक्बाल खान पुढे म्हणाले, “ही पिल्लं आता खूपच हुशार झाली आहेत, कारण त्यांना नेमका ब्रेक कधी असतो हे बहुतेक समजू लागलं आहे! आम्ही एखादा सीन पूर्ण केला की ती कुठूनतरी समोर येतात आणि सगळेच त्यांना जवळ बोलावू लागतात. कधी-कधी आम्ही एखाद्या सीनबद्दल चर्चा करत असतो आणि ती शांतपणे आमच्या शेजारी येऊन बसतात. मग अचानक सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे जातं, कारण प्रत्येकालाच त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवायचा असतो. हे सगळं पूर्णपणे अनपेक्षित असतं, पण हे छोटे-छोटे क्षण आमच्या सेटवरील दिवसांचा एक अतिशय सुंदर भाग बनले आहेत.”

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

शिवाजी विद्यापीठात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात; ‘वंदे मातरम्’ पुस्तकाचे मूकवाचन

शिवाजी विद्यापीठात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात; ‘वंदे मातरम्’ पुस्…