Home Uncategorized नवरात्रोत्सव काळात श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना वाहनतळ, तसेच दंडात्मक कारवाईबाबत सहकार्य करावे ! – मंदिर महासंघाचे निवेदन

नवरात्रोत्सव काळात श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना वाहनतळ, तसेच दंडात्मक कारवाईबाबत सहकार्य करावे ! – मंदिर महासंघाचे निवेदन

9 second read
0
0
11

no images were found

नवरात्रोत्सव काळात श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना वाहनतळ, तसेच दंडात्मक कारवाईबाबत सहकार्य करावे ! – मंदिर महासंघाचे निवेदन

कोल्हापूर – श्री महालक्ष्मी (अंबाबाई) देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवाच्या काळात बाहेरून येणार्‍या अनेक भाविकांना शहरातील वाहतूक व्यवस्था, गाड्या न लावू देणे यांची त्यांना पुरेशी माहिती नसते. त्यामुळे वाहन लावण्यासाठी जागा न उपलब्ध झाल्याने किंवा अनवधानाने वाहन ‘वाहने न लावणे’ या क्षेत्रात वाहने उभी केल्याने काही भाविकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे भाविकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. तरी नवरात्रोत्सव काळात श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना वाहनतळ, तसेच दंडात्मक कारवाईबाबत सहकार्य करावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती यांना देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी स्वीकारले.

याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, श्री. कृष्णात पोवार, अखिल भारत हिंदु महासभेचे श्री. मनोहर सोरप, पूजा शिंदे, भाजपचे श्री. एस्.बी. देवणे, शिवराष्ट्र धर्म संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. दिलीप भिवटे, हिंदुत्वनिष्ठ श्री. शशी बीडकर, श्री. सचिन भोसले, राजाराम कारखान्याचे संचालक श्री. सर्जेराव पाटील, मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. प्रसाद कुलकर्णी, संयोजक श्री. प्रमोद सावंत, सहसंयोजक श्री. गजानन गुरव, नरवीर शिवा काशिद यांचे १३ वे वंशज श्री. आनंदराव काशीद, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. रामभाऊ मेथे उपस्थित होते.

बाहेरगावाहून येणार्‍या भाविकांना वाहनतळाच्या ठिकाणांची माहिती मिळावी यासाठी शहराच्या प्रवेशद्वारांवर आणि प्रमुख मार्गांवर दिशादर्शक फलक लावावेत, वाहतूक पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने भाविकांना योग्य मार्गदर्शन करून सहकार्य करावे, अशाही मागण्या या प्रसंगी करण्यात आल्या. श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरात ठिकठिकाणी ‘बॅरिकेटस्’ लावल्याने भाविकांना प्रदक्षिणा घालण्यासाठी अडचणी येत आहेत, तसेच परिसरातील देवतांना ‘तेल’ वाहण्यासाठी येणार्‍या भाविकांना अडचण निर्माण होत आहे, त्यामुळे ते खुले करावे, अशी मागणीही या प्रसंगी करण्यात आली.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उचगाव येथे cGMP मार्गदर्शन विषयक सेमिनार संपन्न

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उचगाव येथे cGMP मार्गदर्शन विषयक सेमिनार संपन्न कोल्हापूर,(प्रतिनिध…