Home संस्कृतिक महापालिकेच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५७ वी जयंती उत्साहात साजरी

महापालिकेच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५७ वी जयंती उत्साहात साजरी

2 second read
0
0
5

no images were found

महापालिकेच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५७ वी जयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर, : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५७ व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने गांधी मैदान, वरुणतीर्थवेश येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड व  उपमहापौर अक्षय जरग यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच गांधी मैदान परिसरात आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड व  उपमहापौर अक्षय जरग यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी महिला व बालकल्याण उपसभापती दीपा ठाणेकर, नगरसेविका निलांबरी साळोखे, उपायुक्त परितोष कंकाळ, नागेंद्र मुतकेकर, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, राम काटकर, उपशहर अभियंता मिलिंद जाधव, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, कनिष्ठ अभियंता राजेश हुजरे, अनिल कोर्डे, कॉम्रेड चंद्रकांत यादव, अनिल चव्हाण, शर्मण पाटील, सुमित लपाटकर, हंबीराव मेंगाने, सूर्यकांत यादव, राजेंद्र पायमल, संजय अतिग्रे, पांडू भोळे, दगडू पाटील, राजू मगदूम, शिरीष गायकवाड, संभाजी पाटील, सतीश सावंत आदी उपस्थित होते.   यावेळी छत्रपती शाहू विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संस्कृतिक
Comments are closed.

Check Also

शाश्वत अभियांत्रिकीच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवा : कुणाल जगदाळे

शाश्वत अभियांत्रिकीच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवा : कुणाल जगदाळे – डी. वाय. पाट…