Home Video लखपती दीदींच्या घरी प्रज्वलित झाला ‘आशीर्वाद दिवा’

लखपती दीदींच्या घरी प्रज्वलित झाला ‘आशीर्वाद दिवा’

0 second read
0
0
8

no images were found

लखपती दीदींच्या घरी प्रज्वलित झाला ‘आशीर्वाद दिवा’ : सेवा संकल्प अभियानातून ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनाला बळ

कोल्हापूर,: उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना दिली जात आहे. या अभियानांतर्गत किरवे (ता. गगनबावडा) येथील ‘लखपती दीदी’ तसेच विधवा महिला श्रीमती रूपाली चव्हाण यांच्या घरी ‘आशीर्वाद दिवा’ प्रज्वलित करण्यात आला.

यावेळी श्रीमती चव्हाण यांनी ‘आशीर्वाद दिवा’ हा आपल्या आयुष्यातील आशा, आत्मविश्वास आणि नव्या उमेदीचे प्रतीक असल्याचे सांगितले. उमेद अभियानाच्या माध्यमातून मिळालेले मार्गदर्शन व सहकार्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत झाल्याचे त्यांनी नमूद केले.

उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना विविध उपक्रम, मार्गदर्शन आणि सहकार्य उपलब्ध करून देत स्वावलंबनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. ‘लखपती दीदी’ म्हणून स्वावलंबी झालेल्या श्रीमती चव्हाण यांच्या घरी प्रज्वलित झालेला ‘आशीर्वाद दिवा’ ग्रामीण महिलांच्या आत्मविश्वास आणि आर्थिक सक्षमीकरणाचा संदेश देणारा ठरला.

या उपक्रमास गट विकास अधिकारी अलमास सय्यद, तालुका अभियान व्यवस्थापक मनोज चौगले आणि प्रभाग समन्वयक सागर रासम यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

महापालिकेच्यावतीने माजी पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री जयंती साजरी

महापालिकेच्यावतीने माजी पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री जयंती साजरी कोल्हापूर :- माजी पंतप्…