Home आरोग्य अधिकारी  यांच्या हस्ते 2,000 बेडच्या अदाणी आरोग्य मंदिराची पायाभरणी

अधिकारी  यांच्या हस्ते 2,000 बेडच्या अदाणी आरोग्य मंदिराची पायाभरणी

6 second read
0
0
6

no images were found

अधिकारी  यांच्या हस्ते 2,000 बेडच्या अदाणी आरोग्य मंदिराची पायाभरणी

अदाणी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदाणी यांची 2035 पर्यंत राज्यात पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये 1 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीची घोषणा

कोलकाता, : पश्चिम बंगालचे माननीय मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी आज कोलकाता येथील न्यू टाउनमधील बंगाल सिलिकॉन व्हॅली टेक हब येथे 2,000 बेड च्या अदाणी आरोग्य मंदिराची पायाभरणी केली. पश्चिम बंगालच्या 2026 च्या आरोग्यसेवा दृष्टिकोनाशी सुसंगत असलेला हा प्रकल्प अदाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून,या प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी 2 लाखांहून अधिक इनपेशंट्स आणि 20 लाखांहून अधिक आऊटपेशंट्सना सेवा मिळणार असून सुमारे 10,000 रोजगार निर्माण होणार आहेत. पूर्व भारत आणि त्यापलीकडील भागांसाठी जागतिक दर्जाचे अकादमिक मेडिकल सेंटर आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा परिसंस्था म्हणून या प्रकल्पाची संकल्पना करण्यात आली असून, यासाठी 4,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात येणार आहे.

51.75 एकर क्षेत्रात विस्तारलेले अदाणी आरोग्य मंदिर हे मल्टी-स्पेशालिटी रुग्णालय असेल. यासोबतच स्टेप-डाउन आणि ट्रान्झिशनल केअर सुविधाही असतील. या सर्वसमावेशक परिसंस्थेत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवासाची सुविधा उपलब्ध करून देणारे मेडिटेल आणि विश्राम गृह यांचाही समावेश असेल.

“श्री.अदाणी,बंगालच्या पुनर्बांधणीसाठी आम्ही आपल्या उपस्थितीची अपेक्षा करतो. अंतिम दृष्टीकोन केवळ रुग्णालयाचा कॅम्पस उभारण्यापुरता मर्यादित नाही, तर तो पूर्णपणे एकात्मिक आरोग्यनगरीचा असेल. भारतात इतक्या उच्च दर्जाचे रुग्णालय कुठेही नाही. या रुग्णालयामुळे मेडिकल टुरिझमला मोठी चालना मिळेल. हा आमच्यासाठी ऐतिहासिक, अर्थपूर्ण आणि शुभ दिवस आहे. बंगालचा विकास झाला तरच विकसित भारत 2047 साकार होऊ शकतो,” असे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी सांगितले.

“अदाणी आरोग्य मंदिर ही जागतिक दर्जाची, नफा न कमावणारी वैद्यकीय संस्था असेल. येथे 2,000 बेड असतील, त्यापैकी 1,000 बेड समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असतील. राज्य आणि केंद्र सरकारच्या आरोग्य विमा योजनांअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना या खाटांवर उपचार मिळतील,” असे अदाणी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी सांगितले.

गुजरातमधील मुंद्रा हे ग्रुपच्या मेगा-प्रकल्पांसाठी पायाभूत केंद्र कसे ठरले, याचा संदर्भ देत श्री. अदाणी यांनी पूर्वेकडील या राज्याला ग्रुपची कर्मभूमी असे संबोधले. त्यांनी 2035 पर्यंत राज्यात बंदरे, लॉजिस्टिक्स, अक्षय ऊर्जा, वीज निर्मिती, वीज पारेषण आणि वितरण, रस्ते व पूल, ग्रीन सिमेंट आणि हायपरस्केल डेटा सेंटर्स अशा विविध क्षेत्रांमध्ये 1 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचा रोडमॅप जाहीर केला.

अदाणी आरोग्य मंदिरच्या कॅम्पसमध्ये वैद्यकीय महाविद्यालय असेल. येथे दरवर्षी 150 पदवीपूर्व विद्यार्थी, 100 हून अधिक पदव्युत्तर विद्यार्थी आणि 40 हून अधिक सुपर-स्पेशालिस्ट विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.यामध्ये कॉलेज ऑफ नर्सिंग तसेच अलाइड हेल्थकेअर आणि पॅरामेडिकल शिक्षणासाठी संस्थेचाही समावेश असेल.त्यामुळे डॉक्टर,परिचारिका,तंत्रज्ञ आणि अलाइड हेल्थकेअर व्यावसायिकांच्या पुढील पिढीसाठी बहुविषयक परिसंस्था निर्माण होईल. या व्यापक कॅम्पस परिसंस्थेत आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी निवासी सुविधाही उपलब्ध असतील.

पहिल्या टप्प्यात हे मल्टी-स्पेशालिटी रुग्णालय कर्करोगाच्या उपचारांवर लक्ष केंद्रित करेल आणि प्रगत तृतीयक तसेच अत्यंत विशेषीकृत आरोग्यसेवा उपलब्ध करून देईल.

अदाणी आरोग्य मंदिरमध्ये जीनोमिक्स,प्रिसिजन मेडिसिन,बायोमेडिकल इन्फॉर्मेटिक्स,आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लिनिकल ट्रायल्स,मॉलिक्युलर आणि इतर अप्लाइड बायोमेडिकल सायन्सेसचा समावेश असलेली संशोधन परिसंस्था विकसित केली जाईल.वैज्ञानिक शोधांचे सुधारित निदान, उपचार आणि प्रतिबंधामध्ये रूपांतर करण्यावर रुग्णालयाचा भर असेल.

भारतीय संशोधनाच्या वातावरणात जागतिक वैज्ञानिक कौशल्य आणि क्षमता आणण्यासाठी ही संस्था आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबत नवीन ज्ञान, तंत्रज्ञान,क्लिनिकल पाथवेज आणि बौद्धिक संपदा यांच्या सहनिर्मितीसाठी काम करेल. हे संशोधन भारताच्या विशिष्ट आरोग्यविषयक प्राधान्यक्रमांवर लक्ष केंद्रित करेल तसेच संपूर्ण जगाला लाभदायक ठरणारे वैज्ञानिक उपाय विकसित करेल.

अदाणी फाउंडेशनने अमेरिकेतील मेयो क्लिनिक ग्लोबल कन्सल्टिंग आणि सिंगापूरच्या सिंगहेल्थ यांच्याशी भागीदारी केली असून, क्लिनिकल केअर, अकादमिक मेडिसिन, डिजिटल हेल्थ, गुणवत्ता, मनुष्यबळ विकास आणि नवोन्मेष या क्षेत्रांमध्ये जागतिक तज्ज्ञता उपलब्ध करून घेतली जाणार आहे.

या गुंतवणुकीमुळे कोलकात्यात एक प्रमुख आरोग्यसेवा आणि शैक्षणिक संस्था उभी राहणार असून, दुसऱ्या टप्प्यात विविध स्पेशालिटी आणि सुपर-स्पेशालिटीसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स विकसित करण्यासाठी व्यासपीठ तयार होईल. सर्वसमावेशक आरोग्यसेवा केंद्र निर्माण करून अदाणी आरोग्य मंदिर कोलकाता या प्रदेशातून उपचारासाठी बाहेरील भागात जाण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत करेल.

राज्यातील अदाणी ग्रुपच्या औद्योगिक आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील उपक्रमांसोबतच, श्री. अदाणी यांनी प्रसिद्ध कुमारटुली घाटाच्या पुनरुज्जीवनासाठीही मदतीची घोषणा केली. ऐतिहासिक रायटर्स बिल्डिंगच्या पुनर्संचयितीसाठी आणि अदाणी पूजो प्रिव्ह्यूच्या माध्यमातून कोलकात्याच्या दुर्गापूजेची कला व सांस्कृतिक भावना जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी ग्रुपने पश्चिम बंगाल सरकारसोबत दोन सामंजस्य करार (MoUs) केले. या उपक्रमाच्या माध्यमातून पूजा आयोजक, कलाकार, कारागीर, सेवा पुरवठादार आणि बंगालच्या व्यापक परिसंस्थेला पाठबळ मिळणार आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य
Comments are closed.

Check Also

महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना करा

महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना करा आयटक संलग्न गोकुळ कर्मचारी संघटनेची …