Home Uncategorized दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली बैठक

दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली बैठक

0 second read
0
0
5

no images were found

दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली बैठक

कोल्हापूर :  यंदा अल् निनोच्या प्रभावामुळे सर्वत्र पर्जन्यमान कमी आहे.कोल्हापूर जिल्ह्यात सरासरीच्या साधारणता 51 टक्के इतकाच पाऊस झाला आहे . या पार्श्वभूमीवर विजय राठोड यांनी बैठक घेऊन आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्ह्यातील पर्जन्यमान,खरीप हंगामातील पिकांची सद्यस्थिती,पीक विमा तसेच आगामी रब्बी हंगामाच्या नियोजनाबाबत जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची आढावा बैठक आज संपन्न झाली.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, उपसंचालक नामदेव परीट, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, आत्मा प्र.संचालक रक्षा शिंदे, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ महेश शेजाळ, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता मिलिंद किटवाडकर, भूजलचे वरिष्ठ भूवैज्ञानिक शशिकांत निंबाळकर प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील धरण निहाय पाणीसाठा तपासून पाण्याचे नियोजन करावे. तर पशुसंवर्धन विभागाने चारा नियोजनाच्या अनुषंगाने आत्तापासूनच तयारी करावी. तसेच संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पीक स्थितीची पाहणी करावी असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले. तत्पूर्वी कृषी अधीक्षक श्री पांगारे यांनी जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या अनुषंगाने सद्यस्थितीचा आढावा पीपीटीद्वारे सादर केला.
२१ सप्टेंबर अखेर जिल्ह्यात ८८२.६ मि.मी.इतक्या पर्जन्यमानाची नोंद झाली आहे तर सुमारे १.५८ लाख हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली आहे.पेरणीची टक्केवारी सुमारे ८७.३८ इतकी आहे.कमी पर्जन्यमानामुळे हलक्या जमिनीवरील काही भागात जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होत असून,पुढील काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी विभागामार्फत आवश्यक पीक संरक्षण उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहितीही श्री पांगारे यांनी या बैठकीत दिली.
या स्थितीत जिल्हा प्रशासन व कृषी विभागाकडून पिकांची सद्यस्थिती पर्जन्यमान आणि जमिनीतील ओलावा यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आवश्यक त्या ठिकाणी तांत्रिक मार्गदर्शन व पीक संरक्षण उपाययोजना उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. या बैठकीसाठी करवीर उप विभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, किरण पाटील, करवीर तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, पशुसंवर्धन सहाआयुक्त पी पी कुलकर्णी यांच्यासह इतर तालुक्यातील संबंधित उपविभागीय व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

टीबी मुक्त भारत अभियान यशस्वी करा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

टीबी मुक्त भारत अभियान यशस्वी करा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड : दानशूर व्यक्ती, सं…