no images were found
6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला अभिवादन करुया – पालकमंत्री
कोल्हापूर : आधुनिक भारताच्या जडणघडणीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे योगदान महत्वपूर्ण आहे. सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करणारे आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त शनिवार दिनांक 6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करुया, असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.
शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त करुन त्यांचे विचार आणि कार्य सर्वांपर्यंत पोहोचवूया. या उपक्रमात आपण सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक, तरुण मंडळांचे प्रतिनिधी, बँकर्स, ग्राहक, बचत गटांचे सदस्य, शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांसह समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे व इतरांनाही सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे. आपल्या लोकराजाला आदरांजली वाहण्यासाठी सर्वजण 6 मे रोजी सकाळी 10 वाजता आहे त्या ठिकाणी 100 सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन करुया, असे आवाहन पालकमंत्री श्री केसरकर यांनी केले आहे.