Home Uncategorized बँक ऑफ बडोदा व बरंच काही फौंडेशनकडून महापालिकेला सीएसआरच्या माध्यमातून साहित्याची भेट

बँक ऑफ बडोदा व बरंच काही फौंडेशनकडून महापालिकेला सीएसआरच्या माध्यमातून साहित्याची भेट

36 second read
0
0
5

no images were found

बँक ऑफ बडोदा व बरंच काही फौंडेशनकडून महापालिकेला सीएसआरच्या माध्यमातून साहित्याची भेट १३७ एलईडी दिवे एलईडी स्क्रीन  २० संगणक संच महापालिकेकडे सुपूर्द

कोल्हापूर, : शहरातील बँक ऑफ बडोदा व बरंच काही फौंडेशनच्यावतीने कोल्हापूर महानगरपालिकेला १३७ एलईडी दिवे, ५ एलईडी स्क्रीन व २० संगणक संच असे सुमारे १२ लाख रुपये किमतीचे साहित्य सीएसआरच्या माध्यमातून देण्यात आले. या साहित्याचा लोकार्पण व हस्तांतरण कार्यक्रम आज कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे पार पडला. बँक ऑफ बडोदाचे रिजनल हेड प्रकाश जाधव व बरंच काही फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप संकपाळ यांनी सदर साहित्य आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे सुपूर्द केले.

            महानगरपालिकेच्या विविध कार्यालयीन कामकाजासाठी २० संगणक संच, शहरातील विविध ठिकाणी आवश्यकतेनुसार वापरण्यासाठी ५ एलईडी स्क्रीन तसेच शहरातील प्रकाश व्यवस्थेसाठी १३७ एलईडी दिवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सीएसआरच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या या साहित्यामुळे महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाला तसेच नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांना हातभार लागणार आहे. महानगरपालिकेच्या विकासकामांमध्ये सामाजिक संस्था, उद्योग व विविध आस्थापनांनी सीएसआरच्या माध्यमातून सहभागी होऊन शहराच्या विकासासाठी योगदान द्यावे असे आवाहन यावेळी आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

            यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त नागेंद्र मुतकेकर, सहायक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर, सिस्टीम मॅनेजर सशपालसिंग रजपूत, विद्युत अभियंता नारायण पुजारी, बँक ऑफ बडोदाचे ब्रँच हेड नीरज पांडे, अभिजीत खराडे, सूर्यकांत काळे, विनायक पोवार, बरंच काही फौंडेशनच्या अश्विनी संकपाळ, अरविंद माने, अर्जुन संकपाळ, दीप कांबळे, समर्थ संकपाळ, ओम ठिपुगडे आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

टीबी मुक्त भारत अभियान यशस्वी करा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

टीबी मुक्त भारत अभियान यशस्वी करा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड : दानशूर व्यक्ती, सं…