Home Uncategorized सेवा संकल्प अभियांनातर्गत अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांची बेघर निवारा केंद्रांना भेट

सेवा संकल्प अभियांनातर्गत अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांची बेघर निवारा केंद्रांना भेट

1 min read
0
0
8

no images were found

सेवा संकल्प अभियांनातर्गत अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांची बेघर निवारा केंद्रांना भेट

 कोल्हापूर  : राज्य शासनाच्या “सेवा संकल्प अभियान” अंतर्गत कोल्हापूर शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्यावतीने आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर, वृक्षारोपन, योग व ध्यान, महिलांचे आरोग्य व स्वच्छता, करिअर कौन्सिलिंग, अनाथालय/वृध्दाश्रम भेट, स्वच्छता उपक्रम, प्लास्टिकमुक्ती जनजागृती, सायबर सुरक्षा, व्यसनमुक्त, मतदान जनजागृती, शासकिय योजनांची जनजागृती तसेच सेवा सेतू अभियान, सेवा माझे योगदान, इत्यादी उपक्रम राबविण्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.

       याचाच एक भाग म्हणून दिनदयाळ अत्योंदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान (DAY-NULM) अंतर्गत शहरातील विचारे विद्यालय, जेमस्टोन ब्लिडींग, सी.बी.एस व्यापारी संकुल, लक्ष्मीपुरी, शिरोली जकात नाका, शाहू जकात नाका या ठिकाणी सुरू असलेल्या शहरी बेघर निवारा केंद्राना अति.आयुक्त शिल्पा दरेकर यांनी भेट दिली व लाभार्थ्यांशी संवाद साधला.

            यावेळी लाभार्थ्यांची आस्थेने विचारपूस करण्यात आली. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या दैनंदीन गरजा अडचणी तसेच उपलब्ध सुविधांची माहिती घेण्यात आली. या ठिकाणी आवश्यक त्या सोई,सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांना मार्गदर्शन करण्यात आले. राज्य शासनाच्या निर्देशानुसार “सेवा संकल्प अभियान” प्रभावीपणे राबविण्यासाठी महानगरपालिकेमार्फत विविध जागृतिपर व सामाजिक उपक्रम घेण्यात येत आहेत. यामध्ये नागरिकांचा सहभाग व त्यांच्याशी थेट संवाद साधण्यास विशेष महत्व देण्यात येत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

ईएसआयसी लाभापासून एकही कामगार वंचित राहता कामा नये : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

ईएसआयसी लाभापासून एकही कामगार वंचित राहता कामा नये : पालकमंत्री प्रकाश आबिटकर; २…