Home Uncategorized रॅकॉल्ड कडून प्रोन्टो डार्क ५ लि  लाँच; इन्स्टंट वॉटर हीटर श्रेणीत स्टायलिश डिझाइनची भर

रॅकॉल्ड कडून प्रोन्टो डार्क ५ लि  लाँच; इन्स्टंट वॉटर हीटर श्रेणीत स्टायलिश डिझाइनची भर

30 second read
0
0
6

no images were found

रॅकॉल्ड कडून प्रोन्टो डार्क ५ लि  लाँचइन्स्टंट वॉटर हीटर श्रेणीत स्टायलिश डिझाइनची भर

 

  • नवीन इन्स्टंट वॉटर हीटरमध्ये इटालियन डिझाइन, आकर्षक डार्क फिनिश आणि जलद वॉटर हीटिंगचा समावेश;
  • आधुनिक जीवनशैलीचा अनुभव देणाऱ्या नव्या  डीव्हीसी द्वारे उत्पादनाची वैशिष्ट्ये सादर

    मुंबई : भारतातील आघाडीच्या प्रीमियम वॉटर हीटिंग ब्रँडपैकी एक असलेल्या रॅकॉल्ड ने आपल्या इन्स्टंट वॉटर हीटर पोर्टफोलिओमध्ये प्रोन्टो डार्क ५ लि या नव्या उत्पादनाची भर घातली आहे. आधुनिक आणि डिझाइनबाबत जागरूक ग्राहकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला प्रोन्टो डार्क , इटालियन डिझाइन, आकर्षक ग्लॉसी डार्क फिनिश, जागा वाचवणारे स्लीक डिझाइन आणि जलद हीटिंग परफॉर्मन्स यांचा मेळ घालतो. त्यामुळे स्टाइल आणि दैनंदिन वापरातील कार्यक्षमता यांचा सुंदर संगम साधणारे हे प्रीमियम उपकरण ठरते.

     कॉम्पॅक्ट डिझाइन आणि आकर्षक डार्क फिनिशमुळे प्रोन्टो डार्क  आधुनिक बाथरूम तसेच किचनमध्ये सहजपणे उठून दिसतो आणि जागेला अधिक आकर्षक व सुसंस्कृत लूक देतो. त्याची ५ लिटर क्षमता आणि जलद हीटिंग क्षमता दैनंदिन वापरासाठी आवश्यक आराम आणि सुविधा प्रदान करते. त्यामुळे आधुनिक शहरी घरांसाठी हा इन्स्टंट वॉटर हीटर उपयुक्त ठरतो.

      डिझाइनसोबतच प्रोन्टो डार्क मध्ये सुरक्षिततेलाही महत्त्व देण्यात आले आहे. यामध्ये शॉक-प्रूफ बॉडी, फंक्शनल थर्मोस्टॅट, थर्मल कट-आउट आणि प्रेशर रिलीफ मेकॅनिझम यांसारख्या अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे. याच्या केंद्रस्थानी असलेल्या १२-बोल्ट सिस्टममुळे हे उपकरण ६.५ बार पर्यंतच्या पाण्याच्या दाबाचा सामना करण्यासाठी इंजिनिअर्स च्या माध्यमातून बनविण्यात आले आहे. त्यामुळे उंच इमारतींमधील घरांसाठीही ते योग्य असून दैनंदिन वापरासाठी अधिक विश्वासार्हता प्रदान करते.

         लाँचच्या निमित्ताने रॅकॉल्ड ने एक नवीन डिजिटल व्हिडिओ कॅम्पेन (डीव्हीसी ) देखील सादर केले आहे. या डीव्हीसी च्या माध्यमातून उत्पादनाच्या डिझाइन-केंद्रित स्थानाला प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले आहे. वॉटर हीटरशी संबंधित पारंपरिक कार्यक्षमतेच्या पलीकडे जात,प्रोन्टो डार्क हे आधुनिक जीवनशैलीशी सहजपणे जुळणारे उपकरण म्हणून या कॅम्पेनमध्ये सादर करण्यात आले आहे—जिथे स्टाइल, आराम आणि कार्यक्षमता यांचा सुंदर मेळ साधला जातो.

       या लाँचबाबत बोलताना मोहित नरुला,व्यवस्थापकीय संचालक आणि कंट्री मॅनेजर – अरिस्टॉन ग्रुप इंडिया प्रा.लि. म्हणाले की “ग्राहकांची उपकरणे निवडण्याची पद्धत बदलत आहे. कार्यक्षमता आजही अत्यंत महत्त्वाची आहे; मात्र डिझाइन, सौंदर्यदृष्टी आणि एखादे उत्पादन घराच्या वातावरणाशी किती सहजपणे जुळते, यालाही खरेदीच्या निर्णयांमध्ये वाढते महत्त्व मिळत आहे. त्यामुळे ब्रँड्ससाठी पारंपरिक श्रेणीच्या अपेक्षांच्या पलीकडे जाण्याची महत्त्वाची संधी निर्माण झाली आहे. प्रोन्टो डार्क ५लि च्या माध्यमातून आम्ही हा विचार वॉटर हीटिंग श्रेणीत आणत आहोत. रॅकॉल्ड च्या इटालियन डिझाइन परंपरेचा आणि भारतीय ग्राहकांच्या बदलत्या गरजांचा मेळ आम्ही या उत्पादनातून साधला आहे. भारतातील आमच्या प्रीमियम पोर्टफोलिओला अधिक सक्षम करण्यासोबतच ग्राहकांसाठी अधिक मूल्य निर्माण करणारी वेगळी उत्पादने सादर करण्याच्या आमच्या व्यापक दृष्टिकोनाचा हा लाँच एक भाग आहे.”

        गेल्या अनेक वर्षांपासून वॉटर हीटर्सकडे प्रामुख्याने कार्यक्षमतेच्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. मात्र, घरातील जागा आता केवळ वापरासाठीच नव्हे तर सौंदर्यदृष्टीनेही महत्त्वाच्या होत असताना, ग्राहकांना चांगली कामगिरी करणाऱ्या तसेच घराच्या वातावरणाशी सुसंगत दिसणाऱ्या उपकरणांची अपेक्षा आहे. प्रोन्टो डार्क च्या माध्यमातून रॅकॉल्ड ने हा दृष्टिकोन वॉटर हीटिंग श्रेणीत आणला असून, कॉम्पॅक्ट डिझाइन आणि आकर्षक सौंदर्याचा आधुनिक उपकरणाकडून अपेक्षित आराम व सुविधांशी मेळ साधला आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

ईएसआयसी लाभापासून एकही कामगार वंचित राहता कामा नये : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

ईएसआयसी लाभापासून एकही कामगार वंचित राहता कामा नये : पालकमंत्री प्रकाश आबिटकर; २…