no images were found
फुटबॉल खेळाडू निखिल खाडे याला नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्यावतीने मदतीचा हात
कोल्हापूर : कोल्हापूरात फुटबॉल खेळासाठी सर्वांच्या मनात एक वेगळंच समीकरण आहे. साहसी खेळ, ईर्षा, आपल्या संघाचा अभिमान यातूनच कोल्हापूर मधील अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत.
याच कोल्हापूरचा असाच एक फुटबॉल खेळाडू– निखिल खाडे
गोलरक्षक म्हणून त्याने आजवर अनेक मोठ्या संघांसाठी क्षेत्ररक्षण केले आहे. मागील वर्षी क्षेत्ररक्षण करताना त्याच्या डोक्याला दुखापत झाली त्याचठिकाणी त्याला पुन्हा दुखापत होऊन सध्या निखिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
आज महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोल्हापूरच्या खेळाडूला मदतीचा 1 लाख रुपयांचा धनादेश सिटी हॉस्पिटल याठिकाणी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे,सरचिटणीस विजय जाधव यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्त करण्यात आला. याचबरोबर मुख्यमंत्री सह्ययता निधीतून जास्तीतजास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी नाम.चंद्रकांतदादा पाटील यांनी निखिलच्या वडिलांशी संवाद साधून आपुलकीने धीर दिला. यावेळी निखिलचे वडील श्री दिलीप खाडे, पत्नी सौ रसिका खाडे यांच्यासह मित्र परिवारातील मंडळी उपस्थित होती.