Home मनोरंजन “सर्वात अनपेक्षित परिस्थितींमध्येच तुम्हाला जाणवतं की एखाद्याची उपस्थिती किती महत्त्वाची असते,” मुस्कान बामने

“सर्वात अनपेक्षित परिस्थितींमध्येच तुम्हाला जाणवतं की एखाद्याची उपस्थिती किती महत्त्वाची असते,” मुस्कान बामने

4 second read
0
0
7

no images were found

“सर्वात अनपेक्षित परिस्थितींमध्येच तुम्हाला जाणवतं की एखाद्याची उपस्थिती किती महत्त्वाची असते,” मुस्कान बामने

मुंबई,  : सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल आपल्या भावनिक कथाकथन, अनपेक्षित वळणं आणि गुंतागुंतीच्या नात्यांमुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. पुष्पा (करुणा पांडे) शनायाच्या (मुस्कान बामने) भूतकाळाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असताना, चिराग (नितीन बाबू) स्वतःला अशा भावनांचा सामना करताना पाहतो ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती.आगामी भागांमध्ये, शनाया अपहरणाच्या घटनेत अडकते आणि संपूर्ण चाळ तिच्या सुरक्षिततेबद्दल चिंतेत पडते. कुटुंब तिचा शोध घेण्यासाठी एकत्र येतं, तर चिराग बाकी सगळं बाजूला ठेवून तिला वाचवण्यासाठी पुढे सरसावतो. या अनुभवामुळे त्यांच्या नात्यातील वेगळा पैलू समोर येतो, विशेषतः जेव्हा चिराग शनायाकडे त्यांच्या गुंतागुंतीच्या लग्नापलीकडे पाहू लागतो. त्यांच्या घटस्फोटाचा निर्णय अजूनही अधांतरी असताना, हा अनपेक्षित प्रसंग दोघांनाही त्यांच्या खऱ्या भावना काय आहेत याबद्दल विचार करायला भाग पाडतो.

    शनायाला वाचवल्यामुळे चिराग आणि शनाया एकमेकांच्या जवळ येतील, की ते तरीही आपापल्या वेगळ्या वाटा निवडतील?

    आगामी कथानकाबद्दल बोलताना मुस्कान बामणे सांगते, “शनाया नेहमीच गोष्टी स्वतः हाताळण्याचा प्रयत्न करत आली आहे, त्यामुळे स्वतःला अशा परिस्थितीत सापडलेली पाहणं जिथे तिला वाचवण्याची गरज आहे, हे तिच्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित आहे. त्या क्षणी चिराग तिच्यासाठी पुढे सरसावतो हे पाहणं अनेक भावना जागृत करतं, विशेषतः जेव्हा त्यांच्या नात्यात आधीच इतकं काही न बोललेलं आहे. कधी कधी सर्वात अनपेक्षित परिस्थितींमध्येच तुम्हाला जाणवतं की एखाद्याची उपस्थिती किती महत्त्वाची असते.”

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई…