Home Uncategorized प्रार्थनास्थळे, शैक्षणिकसंस्था, रुग्णालयांपासून 100 मीटर परिसर फेरीवालामुक्त करा

प्रार्थनास्थळे, शैक्षणिकसंस्था, रुग्णालयांपासून 100 मीटर परिसर फेरीवालामुक्त करा

34 second read
0
0
7

no images were found

प्रार्थनास्थळेशैक्षणिकसंस्थारुग्णालयांपासून 100 मीटर परिसर फेरीवालामुक्त करा: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेची कारवाईअतिक्रमणधारकांनी साहित्य स्वतःहून हटविण्याचे आवाहन

कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील प्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था तसेच सर्वसाधारण रुग्णालयांच्या परिसरातील फेरीवाला अतिक्रमणाबाबत मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दि.18 ऑगस्ट 2026 रोजी आदेश पारित केला आहे. या आदेशानुसार प्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था व सर्वसाधारण रुग्णालयांपासून 100 मीटरच्या परिसरात हॉकिंग अथवा फेरीवाला व्यवसायास परवानगी देणे योग्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

            या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील संबंधित परिसरात अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाले व व्यावसायिकांनी आपले अतिक्रमण तसेच व्यवसायाचे साहित्य स्वतःहून तात्काळ हटवावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. संबंधितांनी अतिक्रमण स्वतःहून न हटविल्यास महानगरपालिकेमार्फत सदर अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

            महानगरपालिका महासभेच्या ठरावानुसार कारवाईदरम्यान हटविण्यात आलेले अथवा जप्त करण्यात आलेले व्यवसायाचे साहित्य संबंधितांना परत करण्यात येणार नाही. त्यामुळे फेरीवाले व व्यावसायिकांनी याची गांभीर्याने नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करावे.

            शहरातील नागरिकांनी तसेच संबंधित फेरीवाले व व्यावसायिकांनी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती घेऊन त्याचे पालन करावे आणि कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई…