Home Uncategorized मास मीडिया संशोधनासाठी एआय वापरावर गुरुवारी एकदिवसीय कार्यशाळा

मास मीडिया संशोधनासाठी एआय वापरावर गुरुवारी एकदिवसीय कार्यशाळा

2 second read
0
0
7

no images were found

मास मीडिया संशोधनासाठी एआय वापरावर गुरुवारी एकदिवसीय कार्यशाळा

 
कोल्हापूर (प्रतिनिधी):- मास मीडिया संशोधनातील आधुनिक साधने, तंत्रे तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा संशोधन प्रक्रियेत प्रभावी वापर या विषयावर शिवाजी विद्यापीठाच्या संशोधन व विकास कक्ष आणि मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पीएम उषा योजनेअंतर्गत ही कार्यशाळा ३ सप्टेंबर २०२६ रोजी मास कम्युनिकेशन विभागात होणार आहे.
सकाळी १० वाजता नोंदणीने कार्यशाळेला सुरुवात होईल. त्यानंतर कार्यशाळेचे उद्घाटन होईल. ११ ते दुपारी २ या वेळेत अतुल नगरकर हे ‘मास मीडिया संशोधन : साधने आणि तंत्रे’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत राजश्री मोरे या ‘मास मीडिया संशोधनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची साधने’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. संशोधनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध साधनांचा वापर, माहितीचा शोध, माहितीचे वर्गीकरण व विश्लेषण, संदर्भ शोधणे आणि संशोधन लेखनाची प्रक्रिया अधिक परिणामकारक करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीने कसा वापर करता येईल, याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यशाळा सर्वांसाठी खुली असून पत्रकार, संशोधकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संशोधन व विकास कक्षाचे संचालक डॉ. तुकाराम डोंगळे आणि मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.
 
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई…