Home सामाजिक  वृद्ध, दिव्यांग, मुले, महिला भाविकांसाठी उद‌्वाहनाची सोय करावी –  अजित पवार

 वृद्ध, दिव्यांग, मुले, महिला भाविकांसाठी उद‌्वाहनाची सोय करावी –  अजित पवार

54 second read
0
0
18

no images were found

 वृद्ध, दिव्यांगमुलेमहिला भाविकांसाठी उद‌्वाहनाची सोय करावी  अजित पवार

            मुंबई  :- पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील निमगाव येथील खंडोबा मंदिर हे पौराणिक धार्मिक स्थळ आहे. याठिकाणी भरणाऱ्या यात्रेला दरवर्षी तीन ते चार लाख भाविक येत असतात. त्याचप्रमाणे वर्षभर येणाऱ्या भाविकांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकदिव्यांगमुलेमहिला आदी भाविकांना मंदिरापर्यंत जाण्याची सोय होण्यासाठी अत्याधुनिक उद‌्वाहनाची सोय करावी. त्यासाठी लागणारी शासकीय जमीन जिल्हा परिषदेला विनामोबदला उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात खंडोबा मंदिर येथे उद‌्वाहन बसविणे आणि इतर सोयीसुविधांबाबत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार दिलीप मोहिते पाटीलसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरानियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयवन वभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डीवित्त विभागाच्या सचिव शैला ए.पुण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते. तसेच पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारजिल्हाधिकारी सुहास दिवसे आदी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीनिमगाव येथील खंडोबा मंदिर उंचावर असल्याने याठिकाणी भाविकांना विनासायास जाता येण्याच्या दृष्टीने स्थानिक लोकप्रतिनिधींनी रोप वेची मागणी केली होती. त्याठिकाणी रोप वेची योग्य उभारणी करता येत नसल्याने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून उद‌्वाहन उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. उद‌्वाहनासह इतर सुविधांसाठी केंद्र सरकारच्या केंद्रीय राखीव निधीमधून पैसे देण्यास मंजुरी मिळाली आहे. भाविकांना चांगल्या सोयीसुविधा दिल्यास येथे चांगले पर्यटनस्थळ निर्माण होऊ शकते. या सुविधांच्या उभारणीसाठी शासकीय जागेची आवश्यकता आहे. सार्वजनिक हितासाठी येथील जमिनीचा वापर होत असल्याने राज्य शासनाने जिल्हा परिषदेला निशुल्क जमीन उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करावी. संबंधित यंत्रणेने उद‌्वाहनाची सुविधा करताना सर्व खबरदारी घ्यावीत्याची देखभाल दुरूस्ती पहावीअसे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

            निमगाव येथील खंडोबा मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकभक्त निवासअॅम्पी थिएटरबगीचापार्किंगकार्यालयप्रसादालयस्वच्छतागृहेस्कायवॉक उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. उद‌्वाहनामधून दिव्यांगवृद्धमहिलाबालके यांना प्राधान्य देण्यात येणार असून एकावेळी २६ नागरिकांना उद‌्वाहनामधून जाता-येता येणार आहेअशी माहिती यावेळी देण्यात आली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…