Home Uncategorized बाल लैंगिक शोषण प्रतिबंध जनजागृतीबाबत विद्यापीठात शुक्रवारपासून प्रशिक्षण कार्यशाळा

बाल लैंगिक शोषण प्रतिबंध जनजागृतीबाबत विद्यापीठात शुक्रवारपासून प्रशिक्षण कार्यशाळा

5 second read
0
0
6

no images were found

बाल लैंगिक शोषण प्रतिबंध जनजागृतीबाबत विद्यापीठात शुक्रवारपासून प्रशिक्षण कार्यशाळा

कोल्हापूर,: बाल लैंगिक शोषण ही गंभीर सामाजिक समस्या असून, त्याच्या प्रतिबंधासाठी व्यापक जनजागृती आणि संवेदनशील समुपदेशन प्रशिक्षणाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठातील यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट येथे दि. ४ व ५ सप्टेंबर २०२६ रोजी दोनदिवसीय ‘बाल लैंगिक शोषण प्रतिबंधासाठी जनजागृती आणि समुपदेशन प्रशिक्षण’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटचे प्र. संचालक डॉ. संतोष सुतार आणि समाजकार्य अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. उमेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजकार्य आणि मास्टर ऑफ रूरल स्टडीज या दोन अभ्यासक्रमाचे विद्यार्थी प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत.

बाल लैंगिक शोषणाचा परिणाम बालकांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या भावनिक, मानसिक आणि सामाजिक विकासावर दीर्घकाळ होऊ शकतो. त्यामुळे शोषणाची संभाव्य लक्षणे व संकेत ओळखणे, बालकांशी संवेदनशीलतेने संवाद साधणे आणि गरजेनुसार योग्य मदत व आधार उपलब्ध करून देणे याबाबत प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे. समाजात या विषयाबाबत असलेले गैरसमज व कलंक दूर करून संवेदनशील संवाद निर्माण करण्यावरही कार्यशाळेत भर दिला जाणार आहे.

बाल लैंगिक शोषण प्रतिबंधाच्या क्षेत्रात गेल्या १७ वर्षांपासून कार्यरत असलेल्या अर्पण (मुंबई) या संस्थेच्या तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संस्थेच्या व्यवस्थापक दिपाली कदम तसेच प्रशिक्षक नेहा मारू, भाविका पोरे, वेदांत रणदिवे आणि तन्वी शाह हे सहभागी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणादरम्यान बाल लैंगिक शोषणाचे स्वरूप, प्रतिबंधात्मक उपाय, बालकांच्या वर्तनातील बदल व संकेत ओळखणे, संवेदनशील संवाद, समुपदेशनाची प्राथमिक कौशल्ये तसेच आवश्यक सहाय्य व सेवांशी बालकांना जोडण्याच्या पद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई…