Home उद्योग गौतम अदाणी यांनी प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चरसाठी नवीन क्रेडिट फ्रेमवर्क विकसित करण्याचे रेटिंग एजन्सींना केले आवाहन

गौतम अदाणी यांनी प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चरसाठी नवीन क्रेडिट फ्रेमवर्क विकसित करण्याचे रेटिंग एजन्सींना केले आवाहन

27 second read
0
0
5

no images were found

गौतम अदाणी यांनी प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चरसाठी नवीन क्रेडिट फ्रेमवर्क विकसित करण्याचे रेटिंग एजन्सींना केले आवाहन

मुंबई,: अदाणी समूहाचे अध्यक्ष श्री. गौतम अदाणी यांनी भारतातील आघाडीच्या क्रेडिट रेटिंग संस्थांपैकी एक असलेल्या केअरएज ग्रुप ला जगातील पहिले सर्वसमावेशक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर साठी क्रेडिट फ्रेमवर्क विकसित करण्याचे आवाहन केले. असे फ्रेमवर्क भारतातूनच का विकसित होऊ नये आणि या प्रयत्नाचे नेतृत्व भारतानेच का करू नये, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

       श्री.अदाणी म्हणाले की, केअरएज ग्रुप सोबतचा त्यांचा संबंध जवळपास दोन दशकांचा आहे. आता हा संबंध 100 हून अधिक संस्थांमधील ₹3 लाख कोटींपेक्षा अधिक रेट केलेल्या मालमत्तांपर्यंत विस्तारला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी रेटिंग संस्थांसमोर एक मूलभूत प्रश्न उपस्थित केला: भारताच्या जोखमींचे मोजमाप करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फ्रेमवर्कमध्ये भारताच्या संभाव्यतांनाही कसे स्थान देता येईल?

       त्यांच्या मते, अनेक विश्लेषणात्मक फ्रेमवर्क अशा काळात विकसित झाले, जेव्हा पायाभूत सुविधा टप्प्याटप्प्याने विकसित होत होत्या, मागणी अधिक स्पष्टपणे दिसत होती आणि मालमत्तांचे स्वतंत्रपणे मूल्यांकन करता येत होते. अनेकदा हे मूल्यांकन सिंगल-अॅसेट डिस्काउंटेड कॅश-फ्लो मॉडेल्सद्वारे केले जात असे. भारताच्या पायाभूत सुविधांचे स्वरूप आता बदलले आहे आणि त्यानुसार त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी वापरली जाणारी फ्रेमवर्क्सही बदलण्याची गरज आहे.

        त्यांनी पायाभूत सुविधांचे तीन प्रकार स्पष्ट केले: रिप्लेसमेंट इन्फ्रास्ट्रक्चर, ज्यासाठी प्रस्थापित पद्धती चांगल्या प्रकारे कार्य करतात; ग्रोथ इन्फ्रास्ट्रक्चर, ज्यामध्ये इकोसिस्टमचे परिणाम आणि मल्टिप्लायर मूल्य विचारात घेणे आवश्यक आहे; आणि “प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर”, ज्यामध्ये अनेक स्तर एकत्र येऊन नवीन मागणी, नवीन इकोसिस्टम्स आणि नवीन क्षमता निर्माण करतात.गुजरातमधील मुंद्रा बंदर हे याचे एक उदाहरण आहे. बंदर म्हणून सुरू झालेला हा प्रकल्प पुढे रेल्वे, लॉजिस्टिक्स, वीज आणि औद्योगिक उपक्रमांना जोडणाऱ्या परस्परसंलग्न नेटवर्कमध्ये विकसित झाला.श्री.अदाणी म्हणाले, “जर आपण केवळ आज दिसणाऱ्या मागणीसाठीच उभारणी केली, तर भारत उद्याच्या संधींसाठी नेहमीच उशिरा पोहोचेल.”

      केरळमधील विझिंजम इंटरनॅशनल सीपोर्ट येथे मूल्य केवळ बंदराच्या क्षमतेपुरते मर्यादित नाही. अनेक दशकांपासून भारताला आपल्या कंटेनर मालाची ट्रान्सशिपमेंट सिंगापूर, दुबई आणि कोलंबोमार्गे करावी लागत होती, ज्याचे परिणाम पैसा, वेळ आणि धोरणात्मक स्वायत्ततेवर होत होते. पारंपरिक क्रेडिट मॉडेल्स अंमलबजावणीचा धोका योग्य प्रकारे मोजतात, असे त्यांनी नमूद केले; मात्र धोरणात्मक पायाभूत सुविधांच्या बाबतीत आर्थिक मूल्याबरोबरच सार्वभौम लवचिकतेचे (sovereign resilience) मूल्यही ओळखणे आवश्यक आहे.खावडा आणखी एक वेगळा पैलू समोर आणते. 30 गिगावॅट क्षमतेच्या अक्षय ऊर्जा विकासामध्ये ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, उत्पादन आणि डिजिटल पायाभूत सुविधा यांचा समावेश आहे. या सर्व घटकांचे एकत्रीकरण हेच त्याचे महत्त्व आहे, केवळ वीज निर्मितीची क्षमता नव्हे, असे श्री. अदाणी यांनी सांगितले.ते म्हणाले, “रेटिंग फ्रेमवर्क्स अनेकदा स्वतंत्र मालमत्तांचे मूल्यांकन करतात. मात्र आजच्या युगातील खरे मूल्य ज्या ठिकाणी निर्माण होत आहे, त्या संगमाला आपण ओळखले पाहिजे—जिथे ‘ऊर्जा + डेटा + उत्पादन’ यांचा मेळ होतो.”

     एआय मुळे हाच प्रश्न आणखी ठळकपणे समोर येतो. अल्गोरिदम, मॉडेल्स आणि सॉफ्टवेअर सतत विकसित होत राहतील; मात्र मोठ्या प्रमाणावर एआय विकसित करण्यासाठी जमीन, डेटा सेंटर्स, कूलिंग, ट्रान्समिशन आणि मोठ्या प्रमाणावर स्वच्छ व विश्वासार्ह ऊर्जेची आवश्यकता असेल. स्पर्धात्मक आघाडी केवळ सर्वोत्तम कोड कोण लिहितो यावर अवलंबून न राहता, बुद्धिमत्तेला मोठ्या प्रमाणावर विस्तारण्यास सक्षम अशी पायाभूत सुविधा कोण उभारू शकतो यावरही अवलंबून असू शकते, असे श्री. अदाणी म्हणाले.

      श्री. अदाणी यांनी स्पष्ट केले की, याचा अर्थ मानके कमी करणे किंवा स्वायत्ततेशी तडजोड करणे असा नाही. “आपल्याला कमी मानके नकोत, तर अधिक व्यापक दृष्टिकोनाची गरज आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी इकोसिस्टम मल्टिप्लायर्स आणि धोरणात्मक लवचिकता ओळखणाऱ्या गतिशील मॉडेल्सची गरज व्यक्त केली.प्रस्तावित केअरएज फ्रेमवर्क मध्ये बहुआयामी पायाभूत सुविधा, इकोसिस्टम मल्टिप्लायर्स आणि अॅडजन्सी व्हॅल्यू यांचे मूल्यांकन केले जाईल. हे फ्रेमवर्क भारतात विकसित झाल्यास उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी एक मानदंड ठरण्याची क्षमता त्यात आहे.ते म्हणाले की, या बदलासाठी काय उभारता येऊ शकते हे पाहण्याबरोबरच ते कठोर परीक्षणाला तोंड देऊ शकते का, हेही पाहणे आवश्यक आहे.

      “एक बांधकामकर्ता जे अद्याप अस्तित्वात नाही त्याची कल्पना करतो. एक विश्लेषक त्या कल्पनेतून वास्तव निर्माण होऊ शकते का, यावर प्रश्न उपस्थित करतो. दोन्ही दृष्टिकोन आवश्यक आहेत.”श्री. अदाणी यांनी आपल्या वक्तव्याचा समारोप करताना म्हटले की, क्रेडिट मूल्यांकनाची शिस्त कायम ठेवली पाहिजे; मात्र एकात्मिक पायाभूत सुविधा प्लॅटफॉर्म्समधून निर्माण होणारे मूल्य ओळखण्यास सक्षम अशी ती अधिक व्यापक केली पाहिजे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

डी. वाय.पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकार

डी. वाय.पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाका…