no images were found
जिल्हा नियोजन समितीच्या कामांना गती द्या, डिसेंबरअखेर कामे पूर्ण करण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देश
कोल्हापूर, : जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर झालेल्या विकासकामांचा दर आठवड्याला आढावा घेऊन कामांना गती द्यावी. तसेच डिसेंबर 2026 अखेर जिल्हा नियोजन समितीमधील मंजूर सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन करावे असे निर्देश आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी अतिरिक्त आयुक्त, शहर अभियता, जल अभियता मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांना दिले.
महानगरपालिकेच्या विकासकामांचा नियमित आढावा घेऊन कामांची प्रगती दर पंधरा दिवसांनी घेणार आहे. प्रत्येक अधिका-यांनी जबाबदारी स्वत: घ्यावी. रस्त्यांच्या कामाचा दर्जा तपासणीसाठी स्वतंत्र तज्ज्ञ सल्लागार कंपनीची नियुक्ती करावी अशा सूचनाही आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्या. यापुढे सर्व विभागातील विकासकामांचा सातत्याने आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत असे स्पष्ट निर्देश दिले. त्याचबरोबर मुख्य अग्निशमन अधिकारी यांनी दैनंदिन क्लासेसची तपासणी करावी. त्याचबरोबर कारंजा सुरु ठेवणेसाठी आठवड्यातील दिवस ठरवून त्याप्रमाणे जाहीर करण्याच्या सूचना शहर अभियंत्यांना दिल्या.
यावेळी अतिरिक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी उपशहर रचनाकर महादेव फुलारी, उपशहर अभियंता सुरेश पाटील, निवास पोवार, अरुणकुमार गवळी, मिलिंद जाधव, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, शाखा अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता उमेश बागूल, अवधूत नेर्लेकर उपस्थित होते.