Home सामाजिक कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या आशा स्वयंसेविकेच्या कुटुंबाला १० लाखांचे सानुग्रह अनुदान

कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या आशा स्वयंसेविकेच्या कुटुंबाला १० लाखांचे सानुग्रह अनुदान

12 second read
0
0
10

no images were found

कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या आशा स्वयंसेविकेच्या कुटुंबाला १० लाखांचे सानुग्रह अनुदान:आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कुटुंबीयांना धनादेश सुपूर्द

 कोल्हापूर, : आजरा तालुक्यातील एरंडोळ येथील कर्तव्य बजावत असताना मृत्यू झालेल्या आशा स्वयंसेविका स्व. सौ. दर्शना शिवाजी गोवेकर यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाच्या वतीने १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या अनुदानाचा धनादेश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.

      कर्तव्य बजावत असताना आशा स्वयंसेविका अथवा गटप्रवर्तक यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय दि. २६ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात आला होता. या शासन निर्णयानुसार राज्यात प्रथमच या सानुग्रह अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे.

       स्व. सौ. दर्शना गोवेकर यांची ग्रामपंचायतीमार्फत आशा स्वयंसेविका म्हणून निवड करण्यात आली होती. त्या २२ एप्रिल २०११ ते २६ जुलै २०२४ या कालावधीत आशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत होत्या. कर्तव्य बजावत असताना झालेल्या अपघातानंतर २९ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांचे दुर्दैवी निधन झाले.

      त्यांच्या पश्चात पती व दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी आरोग्य विभागामार्फत राज्य शासनाकडे सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार स्व. सौ. दर्शना गोवेकर यांच्या कुटुंबास १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले असून, त्याचा धनादेश कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.

    ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत आशा स्वयंसेविका अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या सेवेला शासनाकडून मिळालेली ही आर्थिक व सामाजिक दखल त्यांच्या कुटुंबीयांसाठी आधार देणारी ठरली आहे.

     याप्रसंगी आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरीता थोरात,  . अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. दीपक मेंढेकर सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी बर्गे तसेच श्रीमती खान उपस्थित होत्या.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

डी. वाय.पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकार

डी. वाय.पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाका…