no images were found
उंचगांव येथे विज बील भरणा केंद्र सुरू करा – शिवसेना करवीर तालुका (उध्दव बाळासाहेब ठाकरे )..
* करवीर तालुक्यातील सर्वात जवळपास ५० ते ६० हजार लोकसंख्या असणारे गाव आहे. विज ग्राहकांची संख्या ही १५ ते १६ हजारावर आहे तरी ही उचगांव मध्ये वीज बील भरणा केंद्र नाही ?
कोल्हापूर (प्रतिनिधी):-उचगांव व सरनोबतवाडी व संपूर्ण विस्तारलेल्या आजूबाजूंच्या परिसरातील वीज ग्राहकांना गडमुडशिंगी येथे वीज बील भरण्यास जावे लागते तेथे पण वीज बील भरणा करून घेण्यास मर्यादा आहेत तसेच ज्यांची मुले कामासाठी बाहेर गावी आहेत अशा घरातील वयस्कर लोकांना विज बील गडमुडशिंगी येथे जावून भरणार कोण असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
सर्व वीज ग्राहक हे सर्वच ऑनलाईन ने पैसे भरू शकत नाहीत उदा. फोन पे, गुगल पे इ. तसेच उचगांव व सरनोबतवाडी ते गडमुडशिंगी अंतर जास्त असल्याने वेळेत वीज बील भरले गेले नाहीतर संबंधित वीज वितरण ग्राहकांची वीज कनेक्शन बंद करतात.
वरील सर्व गोष्टीमुळे वीज ग्राहकांना आर्थिक व मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे आपण उचगांव मध्ये आपल्या वीज वितरण कार्यालया वतीने त्वरीत वीज बील भरणा केंद्र सुरू करावे व नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी अन्यथा करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल होणाऱ्या परिणामास आपले कार्यालय जबाबदार असेल.
यावेळी बोलताना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले की, उंचगाव गावचा विस्तार हा मोठा असून गावची लोकसंख्याही खूप आहे. त्यामुळे सर्वच ग्राहक वीज बिल भरण्यासाठी मुडशिंगी येथे जाऊ शकत नाहीत त्यामुळे ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी उंचगाव मध्येच वीज बिल भरण्याची सोय करावी अन्यथा यापुढे आपल्या खात्या विरोधात तीव्र आंदोलन उभारू..
यावेळी उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट म्हणाले की, ग्राहक स्वतः बिल देण्यासाठी येत असताना तुम्ही त्यांना मुडशिंगी येथे का पाठवता असा सवाल त्यांनी केला..
या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने मा.रोहित जयंत कुलकर्णी,उपकार्यकारी अभियंता, वीज वितरण कार्यालय, हुपरी व मा.संदीप शिवाजी काकडे, सहाय्य्क अभियंता, वीज वितरण कार्यालय, उंचगाव यांना देण्याला आले..
यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, सप्टेंबर महिना अखेर उजगाव मध्ये वीज बिल भरणा केंद्र सुरू करू व तोपर्यंत जे ग्राहक या महिन्यातील बिल भरण्यासाठी येतील त्यांचे वीज बिल आमचे अधिकारी ऑनलाइन बिल जमा करून घेतील कोणत्याही ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊ असे आश्वासन अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले..
यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, फेरीवाला संघटना उपतालुकाप्रमुख बाळासाहेब नलवडे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, वाहतूक सेना तालुकाप्रमुख दत्ता फराकटे, संतोष चौगुले, दीपक पोपटानी, सुनील पारपाणी सागर पाटील, शिवाजी लोहार, विनोद रोहिडा कृष्णात तुरुके, वसंत पोवार, धनंजय पाटील,आबा जाधव, सचिन गुरव, सागर यादव ,मोहन रजपूत,ओमकार फराकटे आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते..