Home शैक्षणिक बी.एस्सी. जीवरसायनशास्त्र प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत संधी

बी.एस्सी. जीवरसायनशास्त्र प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत संधी

5 second read
0
0
21

no images were found

बी.एस्सी. जीवरसायनशास्त्र प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत संधी
कोल्हापूर, : शिवाजी विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र अधिविभागात सन २०२६-२७ पासून बारावीनंतर बी.एस्सी. (जीवरसायनशास्त्र) या विषयात पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. करिअरच्या आणि संशोधनाच्या अभिनव संधी असणाऱ्या या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी येत्या १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही माहिती अधिविभागाचे प्रमुख डॉ. कैलास सोनवणे यांनी दिली आहे.
डॉ. सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र अधिविभागात एम.एस्सी. (जीवरसायनशास्त्र) आणि पीएच्.डी. (जीवरसायनशास्त्र) हे अभ्यासक्रम गेल्या ४० वर्षांपासून प्रभावीपणे सुरु आहेत. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून बी.एस्सी. (जीवरसायनशास्त्र) (एईडीपी) हा अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या पूर्ततेनंतर विद्यार्थ्यांना औषध निर्माण कंपन्या, शासनाच्या प्रयोगशाळांत ड्रग टेस्टिंग, फूड टेस्टिंग, शासकीय न्यायवैद्यक तसेच नमुना परीक्षण प्रयोगशाळा, माहिती तंत्रज्ञान कंपन्यामध्ये विविध आजारांवरील असणाऱ्या माहितीचे डेटा मायनिंग, डेटा विश्लेषण, पॅटर्न रिकग्निशन इत्यादी कामे, विविध दवाखान्यांत क्लिनिकल डेटा रिसर्च व एनालिसीस तसेच संशोधन व विकास क्षेत्रांत करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
या अभ्यासक्रमांतर्गत सहाव्या सेमिस्टरमध्ये घेण्यात येणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षणांतर्गत रु. १२,५००/- इतका मासिक भत्ता देण्याचीही व्यवस्था आहे. तरी, इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच, अधिक माहितीसाठी अधिविभागास भेट द्यावी अथवा दूरध्वनी क्र. ०२३१-२६०९१५३/ ८९८३३८१३२९ ईमेल पत्ता biochem@unishivaji.ac.in येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक
Comments are closed.

Check Also

कागल येथील ‘शाहू सृष्टी’ जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करा- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

कागल येथील ‘शाहू सृष्टी’ जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करा- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन …