Home मनोरंजन माधुरी दीक्षित यांनी सांगितलं ‘कोण होणार करोडपती’मध्ये येण्यामागचं खास कारण

माधुरी दीक्षित यांनी सांगितलं ‘कोण होणार करोडपती’मध्ये येण्यामागचं खास कारण

2 second read
0
0
15

no images were found

माधुरी दीक्षित यांनी सांगितलं ‘कोण होणार करोडपती’मध्ये येण्यामागचं खास कारण

कोल्हापूर(प्रतिनिधी):- भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेली माधुरी दीक्षित जेव्हा हॉटसीटवर स्पर्धक म्हणून नव्हे, तर सूत्रसंचालक म्हणून विराजमान होते, तेव्हा उत्सुकता निर्माण होणं साहजिकच आहे. आणि याच उत्सुकतेचं उत्तर आहे ‘कोण होणार करोडपती’! या लोकप्रिय प्रश्नमंजुषा कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकपदी माधुरी दीक्षितची निवड झाल्याची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही तिच्या या नव्या भूमिकेची जोरदार चर्चा रंगली आहे.
नोंदणी सुरू झाल्यामुळे माधुरी दीक्षितला एका नव्या अंदाजात पाहण्याची प्रेक्षकांची प्रतीक्षाही आता सुरू झाली आहे. मात्र, माधुरीसाठी ‘कोण होणार करोडपती’चा भाग होण्यामागचं कारण केवळ हा खेळ नाही, तर या खेळाशी जोडलेली माणसं, त्यांच्या कथा आणि त्यांची स्वप्नं आहेत. याबद्दल सांगताना माधुरी म्हणते, “मला सगळ्यात जास्त उत्सुकता होती ती स्पर्धकांच्या कथा आणि त्यांच्या स्वप्नांमधून त्यांच्याशी जोडून घेण्याची. ‘कोण होणार करोडपती’ हा केवळ प्रश्नांची उत्तरं देऊन पैसे जिंकण्याचा कार्यक्रम नाही, तर स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्याचा, आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा आणि स्वप्नं पाहण्याचं धाडस करण्याचा एक अनुभव आहे.”
अनेक दशकांपासून अभिनेत्री, नृत्यांगना आणि परफॉर्मर म्हणून आपल्या अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या माधुरी दीक्षितसाठी हा कार्यक्रम प्रेक्षकांशी एका वेगळ्या पद्धतीने जोडून घेण्याची संधी घेऊन आला आहे. या नव्या भूमिकेबद्दल बोलताना ती पुढे म्हणते, “‘कोण होणार करोडपती’मधून प्रेक्षकांना माझी एक अधिक सहज आणि उत्स्फूर्त बाजू पाहायला मिळेल, असं मला वाटतं. अभिनेत्री म्हणून आपण एका व्यक्तिरेखेत शिरतो; पण इथे मी फक्त स्वतः असणार आहे. माझ्यासमोर बसलेल्या स्पर्धकांशी गप्पा मारता येतील, त्यांच्या कथा ऐकता येतील आणि त्यांना अधिक जवळून जाणून घेता येईल. माझ्यासाठी हा कार्यक्रम केवळ प्रश्न आणि उत्तरांपुरता मर्यादित नाही. प्रत्येक स्पर्धकासोबत जोडलेली त्यांची स्वप्नं, भावना, हास्याचे क्षण आणि अचानक येणारे आश्चर्याचे प्रसंग या सगळ्यामुळे हा अनुभव खास होतो. मला संवाद साधायला आवडतं, त्यामुळे या खऱ्या आणि अनपेक्षित संवादांचा अनुभव घेण्यासाठी आणि स्पर्धकांसोबत तसेच प्रेक्षकांसोबत हे खास क्षण शेअर करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”
माधुरी दीक्षितच्या सूत्रसंचालनाने ‘कोण होणार करोडपती’मधील प्रत्येक क्षण, प्रत्येक कथा आणि प्रत्येक स्वप्न एका सुंदर उत्सवात रूपांतरित होण्यासाठी सज्ज आहे.
कोण होणार करोडपती’मध्ये सहभागी होण्याची संधी मिळवण्यासाठी Sony LIV ॲप किंवा WhatsApp द्वारे +91 85919 75331 वर नोंदणी सुरू झाली आहे.
लवकरच फक्त सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

कागल येथील ‘शाहू सृष्टी’ जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करा- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

कागल येथील ‘शाहू सृष्टी’ जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करा- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन …