
no images were found
के.एम.सी. कॉलेजात संविधान दिन विविध कार्याक्रमानी साजरा
कोल्हापूर : यशवंतराव चव्हाण के एम सी कॉलेज येथे आज संविधान दिन विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला. सविधान दिनानिमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. संविधान दिनाची सुरुवात राज्यशास्त्र विभागाद्वारे आयोजित भितीपत्रक प्रकाशनाने झाली. यामध्ये बीए भाग तीन राज्यशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक धोरण यावर विविध लेख सादर करून आपला सहभाग नोंदविला. नेहरू युवा केंद्र व राज्यशास्त्र विभाग आणि भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने संविधानावर प्रश्नमंजुषा घेण्यात आली. यामध्ये एकूण चार गटांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी सविधान गट हा विजयी ठरला. सविधान गटामध्ये रिद्धी अविनाश राज्यध्यक्ष, उज्वला बबन सावंत, गौरी पिंटू सावंत, मीसबा वाकरेकर इत्यादी विद्यार्थिनी सहभाग घेतला.
संविधान दिनानिमित्त समाजातील विविध घटकांमध्ये संविधानाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने महाविद्यालयातून संविधान रॅली काढण्यात आली. संविधान रॅलीमध्ये कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेत कर्मचारी सहभागी झाले. संविधान दिनानिमित्त महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग व विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय चोपडा, जिल्हा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर प्रश्नमंजुषा कार्यक्रमाला महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील महाविद्यालय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. संविधान दिनानिमित्त आयोजित संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन माननीय प्र-प्राचार्य डॉ. अरुण पौडमल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. अनिल मुडे, प्रमुख राज्यशास्त्र विभाग, प्रा सचिन धुर्वे, डॉ जे एम शिवणकर प्रमुख, भूगोल विभाग, डॉ एस पी कांबळे प्रमुख आयक्यूएसी यांनी केले. योवळी कार्यक्रमांमध्ये प्रा. पी. डी. तोरस्कर, डॉ बी एम पाटील, ग्रंथपाल आर आर मांगले व महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी व नेहरू युवा केंद्राचे पदाधिकारी उपस्थित होते.