Home Uncategorized रंकाळा परिसरात महापालिकेची कारवाई; १४ भटकी गाढवे जप्त

रंकाळा परिसरात महापालिकेची कारवाई; १४ भटकी गाढवे जप्त

1 second read
0
0
5

no images were found

रंकाळा परिसरात महापालिकेची कारवाई; १४ भटकी गाढवे जप्त

कोल्हापूर,  : रंकाळा परिसर तसेच मुख्य रस्त्यांवर भटक्या जनावरांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका लक्षात घेऊन कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत रंकाळा परिसरात भटकणारी १४ गाढवे जप्त करण्यात आली.
फुलेवाडी मार्गे दत्त मंगल कार्यालयाच्या बाजूने ही गाढवे रंकाळा परिसरात दाखल झाली होती. रस्त्यावर मोठ्या संख्येने गाढवे भटकत असल्याने वाहनधारक तसेच स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत नागरिक तसेच नगरसेवकांकडून महापालिकेकडे वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने कारवाई केली. विशेष मोहिमेदरम्यान सर्व १४ भटकी गाढवे जप्त करण्यात आली.
ही कारवाई आरोग्य निरीक्षक अनिकेत बावडेकर, ऋषिकेश सरनाईक व गीता लखन आरोग्य विभागातील मुकादम, कर्मचारी व ॲनिमल कॅचर यांच्या पथकाने केली.
महापालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख रस्ते, चौक व सार्वजनिक ठिकाणी भटक्या जनावरांमुळे नागरिकांना होणारा त्रास तसेच वाहतुकीला निर्माण होणारे अडथळे दूर करण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया सुरू ठेवण्यात येणार आहेत.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या …