Home Uncategorized मोकाट जनावरांवर महापालिकेची धडक कारवाई – १७९ जनावरे पांजरपोळ येथे रवाना

मोकाट जनावरांवर महापालिकेची धडक कारवाई – १७९ जनावरे पांजरपोळ येथे रवाना

18 second read
0
0
30

no images were found

मोकाट जनावरांवर महापालिकेची धडक कारवाई – १७९ जनावरे पांजरपोळ येथे रवाना

रस्त्यावर जनावरे मोकाट सोडू नयेत पशुमालकांना महापालिकेचे आवाहन

कोल्हापूर  : शहरातील मुख्य रस्ते, चौक तसेच सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोल्हापूर महानगरपालिकेने मोकाट जनावरांविरोधात विशेष मोहीम राबवून आतापर्यंत १७९ जनावरे ताब्यात घेतली असून, ही जनावरे पांजरपोळ येथे थेट जमा करण्यात आली आहेत. मोकाट जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी होण्याबरोबरच वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना अचानक अपघातांना सामोरे जावे लागते. शहरातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणे नागरिकांसाठी सुरक्षित राहावीत यासाठी महानगरपालिकेच्या वतीने ही कारवाई करण्यात येत आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाने मोकाट जनावरांच्या नियंत्रणाबाबत तसेच सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने दिलेल्या आदेश व मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून कारवाई सुरू आहे. सार्वजनिक रस्ते व ठिकाणी जनावरे मोकाट सोडणे टाळण्यासाठी पशुमालकांनी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.

पशुमालकांनी जनावरे मोकाट सोडू नयेत

            महानगरपालिकेने पशुमालकांना आपली जनावरे सार्वजनिक रस्ते, चौक किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी मोकाट सोडू नका असे आवाहन केले आहे. यापुढे रस्त्यावर मोकाट आढळणारी जनावरे ताब्यात घेऊन पांजरपोळ अथवा संबंधित ठिकाणी जमा करण्यात येतील. ताब्यात घेतलेली जनावरे पांजरपोळ येथे जमा केल्यानंतर ती परत दिला जाणार नाही याची रितसर जाहिर नोटीस प्रसिध्द करण्यात आली आहे याची संबंधीत पशुमालकांनी नोंद घ्यावी. शहरातील वाहतूक सुरक्षित, सुरळीत आणि अपघातमुक्त ठेवण्यासाठी नागरिक तसेच पशुमालकांनी महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

भारताची सौदी अरेबिया, बेल्जियम आणि भूतानसोबत सागरी सहकार्याबाबत चर्चा

भारताची सौदी अरेबिया, बेल्जियम आणि भूतानसोबत सागरी सहकार्याबाबत चर्चा : वाढवण, गालाथि…