Home Uncategorized रंकाळा परिसरातील अनधिकृत हातगाडयांविरोधात व्यापक मोहीम ; विभागांनी समन्वयाने कारवाई करावी – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

रंकाळा परिसरातील अनधिकृत हातगाडयांविरोधात व्यापक मोहीम ; विभागांनी समन्वयाने कारवाई करावी – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

1 min read
0
0
7

no images were found

रंकाळा परिसरातील अनधिकृत हातगाडयांविरोधात व्यापक मोहीम विभागांनी समन्वयाने कारवाई करावी – आयुक्त डॉराजेंद्र भारुड

कोल्हापूर,  : रंकाळा परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यासाठी गुरुवार व शुक्रवार व्यापक मोहीम राबविण्यात यावी. या मोहिमेसाठी चारही विभागीय कार्यालये, इस्टेट, अतिक्रमण व अग्निशमन विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी अशा सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या. महापालिका आयुक्त कार्यालयात झालेल्या विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत शहरातील विविध विकास प्रकल्प, पाणीपुरवठा, करवसुली, अतिक्रमण निर्मूलन, शिक्षण, उद्याने तसेच सुरू असलेल्या विकासकामांचा आयुक्तांनी सविस्तर आढावा घेतला.

            शहरातील पार्किंग व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच अनधिकृत हातगाड्या, केबिन्स व इतर अनधिकृत अतिक्रमणांविरोधात सातत्याने कारवाई सुरू ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. अधिकृत हातगाड्या व केबिन्स वगळून अनधिकृत अतिक्रमणांवर नियमानुसार कारवाई करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरात ज्या ठिकाणी पार्किंगसाठी शुल्क आकारले जाते तेथे मंजूर धोरणानुसार महापालिेचा परवाना घेण्यासाठी तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सीएसआरच्या माध्यमातून प्राप्त दोन टिप्पर तसेच महापालिकेने खरेदी केलेल्या नवीन जेसीबीचे महासभेच्या दिवशी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याची कार्यवाही करावी, असे आयुक्तांनी सांगितले. सर्व विभागीय कार्यालयांच्या अखत्यारीतील महापालिकेच्या हॉलची नावे असलेले फलक रंगरंगोटी करून सुस्थितीत ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महापालिका वर्कशॉपमधील स्क्रॅपचा 28 ऑगस्ट 2026 रोजी ई-ऑक्शन करून तेथील सर्व साहित्य तातडीने हलवण्याच्या सूचना दिल्या. महापालिकेचे शिल्लक गाळे ई-ऑक्शन द्वारे देण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. पांजरपोळ येथील गाळेधारकांकडून महापालिकेची थकबाकी वसूल करून, रक्कम न भरणाऱ्या गाळेधारकांची अनधिकृत अतिक्रमणे हटविण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील कोचिंग क्लासेस परवाना देण्यासाठी नगररचना, घरफाळा, अग्निशमन, इस्टेट व परवाना विभागांनी एकत्रितपणे विशेष कॅम्प आयोजित करण्याचे निर्देश दिले. तसेच महापालिकेच्या रस्त्यांच्या कामांच्या दर्जाबाबत सर्व ठेकेदारांची बैठक घेऊन त्यास स्थानिक आमदारांनाही आमंत्रित करावे अशा सूचना शहर अभियंत्यांना देण्यात आल्या. सीएसआरच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या दिशादर्शक फलकांसाठी सर्व उपशहर अभियंत्यांनी आवश्यक ठिकाणांची निश्चिती करावी. महापालिकेच्या चार पार्किंगची माहिती पर्यटकांना सहज मिळावी, यासाठी प्रवेशद्वारापासून योग्य ठिकाणी पार्किंग दिशादर्शक फलक बसवावेत असेही आयुक्तांनी निर्देशित केले. नवीन बांधकामांना नियमानुसार रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे की नाही याची नगररचना विभागाने तपासणी करावी. सीएसआरच्या माध्यमातून बँकेमार्फत 10 हजार बल्ब उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही करण्यासाठी त्यांनी सांगितले.

शाळांच्या सुविधांची तपासणी करण्याचे निर्देश

            शिक्षण विभागाने महापालिकेच्या सर्व शाळांमधील उपलब्ध सुविधांची तपासणी करावी. सहायक आयुक्तांनी अचानक भेटी देऊन शाळांमधील ठेकेदारांच्या किचनची तपासणी करावी तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा तपासावा असे आयुक्तांनी सांगितले. शाळांमधील स्वच्छतागृहांची स्वच्छता, रंगरंगोटी व इतर कामांचा दर्जाही तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कामांना गती

            गणेशोत्सव 2026 च्या अनुषंगाने आवश्यक निविदांची प्रक्रिया आताच पूर्ण करून घ्यावी. कन्व्हर्ट बेल्टची देखभाल-दुरुस्ती करून घ्यावी. गणपती आगमन व विसर्जन मार्गावरील पॅचवर्कचे नियोजन करून कामे वेळेत पूर्ण करावीत. या मार्गावरील झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करावी, तसेच विसर्जन कुंडांची आवश्यक दुरुस्ती अथवा नवीन कुंडांची खरेदी याबाबत तातडीने नियोजन करावे, असे निर्देश आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी संबंधित विभागांना दिले.

            यावेळी अतिरिक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉ.विजय पाटील, संजय सरनाईक, राम काटकर, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर रचनाकर महादेव फुलारी, पदमल पाटील, उपशहर अभियंता सुरेश पाटील, निवास पोवार, अरुणकुमार गवळी, मिलिंद जाधव, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, विधी अधिकारी संदीप तायडे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, रवका अधिकारी प्रशांत पंडत, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले, विद्युत अभियंता नारायण पुजारी, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंह रजपूत, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, परवाना अधिक्षक अशो यादव, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ अभियंता पदमल पाटील उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

महागणेशोत्सव : पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे 23 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात आयोजन

महागणेशोत्सव : पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे 23 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात आयोजन  क…