Home शासकीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करावेत

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करावेत

7 second read
0
0
16

no images were found

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करावेत

 

कोल्हापूर : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (क प्रवर्गातील धनगर समाज वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सन 2024-25 पासून सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (क प्रवर्गातील धनगर समाज वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील 12 वी नंतरचे शिक्षण घेणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी दि. 15 जुलै 2024 पर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक सुनिता नेर्लीकर यांनी केले आहे.

या योजनेकरीता इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेणारा व ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 2 लाख 50 हजारपेक्षा कमी आहे असे विद्यार्थी पात्र असून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्ष भोजन, निवास व निर्वाह भत्यासाठी एकूण रुपये 43 हजार व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रुपये 38 हजारप्रमाणे लाभाचे वितरण केले जाणार आहे. योजनेंतर्गत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता व्दितीय वर्षात 150, तृतीय वर्षात 150 व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 अशा एकूण 450  विद्यार्थ्यांची लाभाकरीता निवड केली जाणार आहे. तसेच प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विद्यार्थ्यांनाही त्यांच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शासन निर्णयानुसार लाभ देण्यात येणार आहे.

प्रवेशासाठी विद्यार्थ्याची मुलभूत पात्रता, शैक्षणिक निकष व इतर निकष पुढीलप्रमाणे-

विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असावा तसेच विद्यार्थी 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा व योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे कमाल वय 30 वर्षापेक्षा कमी नसावे.विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा आदिवास, रहिवाशी असल्याबाबतचा तहसिलदार यांचा दाखला, व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक / अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांस योजनेसाठी अर्ज करताना किमान 60 टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन / CGPA गुण असणे आवश्यक राहील तसेच योजनेतंर्गत सन 2024-25 करिता प्रथम वर्षात 150 विद्यार्थ्यांना, व्दितीय वर्षात 150, तृतीय वर्षात 150 व चतुर्थ वर्षात 150 विद्यार्थी अशा रितीने प्रति जिल्हा 600 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे.

सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला सादर करणे. योजनेतंर्गत एकूण प्रवेश संख्येच्या 70 टक्के जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व 30 टक्के जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतील. विद्यार्थ्यांस इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या, आदिवासी विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा.

विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे. (तहसिलदार यांचेकडील उत्पन्न दाखला) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इ. मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयात, संस्थेमध्ये व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा. तसेच विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा.

अधिक माहितीसाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, कोल्हापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन विचारे माळ, बाबर हॉस्प‍िटल जवळ, कोल्हापूर कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही श्रीमती नेर्लीकर यांनी  कळविले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अमल महाडिक यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर,  कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

अमल महाडिक यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर,  कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यां…