Home शासकीय रेसकोर्स नाका टिंबर मार्केट कमान येथील अनाधिकृत भाजी मंडईवर मोठी कारवाई

रेसकोर्स नाका टिंबर मार्केट कमान येथील अनाधिकृत भाजी मंडईवर मोठी कारवाई

0 second read
0
0
225

no images were found

रेसकोर्स नाका टिंबर मार्केट कमान येथील अनाधिकृत भाजी मंडईवर मोठी कारवाई

कोल्हापूर : मा. प्रशासक बलकवडे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली व अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्या आदेशानुसार शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक 25/11/2022 रोजी अतिक्रमण विभागाकडून कारवाई करणेत आली.

रेसकोर्स नाका टिंबर मार्केट कमान येथील अनाधिकृत भाजी मंडईवर मोठी कारवाई करणेत आली. यामध्ये  10×12 मापाची 27 भाजी शेड  वर कारवाई केली. सदर कारवाई सचिन जाधव अतिक्रमण अधीक्षक, सजन नागलोत कनिष्ठ लिपिक. मुकादम रविंद्र कांबळे, राजू माने, अतिक्रमण पथक कर्मचारी, अतिक्रमण पथक कर्मचारी  कारवाई यांच्या सहकार्याने पार पाडण्यात आली.

सदर कारवाई दरम्यान फेरीवाले यांनी आम्ही शेड काढणार नाही अशी भूमिका घेतली. परंतु विरोध मोडून काढून  अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. काही काळासाठी मनसे अध्यक्ष राजू जाधव यांनी अतिक्रमण काढू नका यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता अतिक्रमण अधिकारांची चर्चा करून आंदोलन मागे घेऊन शेड काढण्यात आली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

लोकसहभागातून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ अभियान यशस्वी करूया – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ 

लोकसहभागातून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ अभियान …