
no images were found
कोल्हापुरात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा; शिवसैनिक-पोलिसांमध्ये झटापट
कोल्हापूर : सीमाप्रश्न प्रलंबित असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील भूभागावर दावा केल्यानंतर रणकंदन सुरु झाले आहे. कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी बसवराज बोम्मई यांचा तीव्र निषेध करत त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी पोलिसांनी तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला असता शिवसैनिकांशी जोरदार झटापट झाली. ही अंत्ययात्रा कोल्हापुरातील दसरा चौक ते जयंती नाला असा काढण्यात येत होती.
दरम्यान, हे आंदोलन काही अंतरावर जाताच पोलिसांनी तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले की, जत, अक्कलकोट व सोलापूरवर बोम्मई दावा करत कर्नाटकचा भाग असल्याचे सांगत आहेत. मात्र, चोराच्या उलट्या बोंबा असतात तशाच बोम्मई यांच्या उलटड्या बोंबा आहेत. संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा सुरु असताना त्याला छेद देण्याचे काम बोम्मई करत आहेत. कर्नाटकमधून येणाऱ्या बसेस बंद केल्या आहेतहा हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करत आहे.
कोल्हापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेह ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या या वादानंतर कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील एसटी बससेवा ही बंद केल्याचे वृत्त आहे. यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी आज कोल्हापुरात सीबीएस स्थानकातील कर्नाटकच्या बस गाड्यांवर जय महाराष्ट्र लिहित कर्नाटकच्या बस गाड्या महाराष्ट्रात येऊ न देण्याचे आवाहन एसटी प्रशासनाला केले.