Home Video RTO वाहन पोर्टल २ महिने बंद – शासनाचा करोडोचा महसूल बुडाला;

RTO वाहन पोर्टल २ महिने बंद – शासनाचा करोडोचा महसूल बुडाला;

12 second read
0
0
18

no images were found

RTO वाहन पोर्टल २ महिने बंद – शासनाचा करोडोचा महसूल बुडाला; सोमवारपर्यंत पोर्टल सुरू न झाल्यास गुरुवारी आरटीओ कार्यालयाला टाळा ठोकण्याचा इशारा

कोल्हापूर: गेली १ ते २ महिने कोल्हापूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन पोर्टल पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाहन खरेदी-विक्री, नाव हस्तांतरण आणि नवीन नोंदणी ही सर्व कामे ठप्प झाली आहेत. यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असून सर्वसामान्य नागरिक व कार डीलर्सचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशन चे इजाज नागरकट्टी यांनी

पत्रकार परिषदेत केला. यामध्ये असोसिएशनने काही मागण्या केलेल्या आहेत.

    असोसिएशनच्या प्रमुख मागण्या:
1. पोर्टल तातडीने सुरू करा – २ महिन्यांपासून बंद असल्याने सर्व व्यवहार बंद

2. आधार-RC स्पेलिंग नियम मागे घ्या – शासनाच्याच चुकांसाठी नागरिकांकडून ₹500 दंड घेणे हा अन्याय आहे

3. PUC साठी OTP सक्ती रद्द करा – PUC चा OTP शी संबंध नाही. बंद नंबर/परदेशातील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. तसेच सहा वेळा ओटीपी येणे बंद करावे.

4. पूर्वसूचना द्या – अचानक नियम लावणे बंद करा. हे नियम गोवा, कर्नाटक, गुजरात मध्ये लागू का नाहीत?

जिल्ह्याला २ मंत्री असून देखील आतापर्यंत एकाही लोकप्रतिनिधीने याची दखल घेतली नाही. तेव्हा याकडे लक्ष दिलेले नाही.
त्यामुळे असोसिएशनने इशारा दिला आहे की, येत्या सोमवार पर्यंत RTO पोर्टल सुरळीत सुरू करण्यात यावे. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच येत्या गुरुवारी आरटीओ कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला. याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील.
असे सांगण्यात आले. यावेळी
सचिव इजाज नागरकट्टी, विक्रम मोतीपुरे, जमीर सय्यद ,अभिजीत चित्रकार, सुधाकर सासने,प्रशांत पाटील, किरण पाटील, समीर मुल्ला, फैयाज अथणीकर, महेश सकपाळ, शितल दत्तवाडे, समीर तकीलदार यांच्यासह कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

गोरगरीबांचे रेशन तात्काळ सुरू करावे ; करवीर शिवसेनेचे बोंब मारो आंदोलन व जोरदार निदर्शने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)..

गोरगरीबांचे रेशन तात्काळ सुरू करावे ; करवीर शिवसेनेचे बोंब मारो आंदोलन व जोरदार निदर्शने (…