no images were found
एनआयटीमध्ये क्लाऊड कम्प्युटिंग लॅबची उभारणी
(पालकमंत्री नामदार आबिटकर यांचे हस्ते उद्घाटन)
कोल्हापूर (प्रतिनिधी):-राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्थापित श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमधील सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत ट्रान्सेन्ड एज्युटेक, पुणे यांच्या सहकार्याने नव्याने उभारलेल्या क्लाऊड कम्प्युटिंग लॅबचे उद्घाटन पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण घेत असतानाच उद्योगस्नेही अद्ययावत कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असताना एनआयटीसारख्या संस्था यात पुढाकार घेत आहेत ही जमेची बाब आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. संस्थेचे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांनी संस्थेतील शाखांमध्ये विद्यार्थ्यांना मिळत असलेले संस्कारक्षम व स्वावलंबन प्रदान करणारे शिक्षण याबाबत विवेचन केले. प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांनी काॅलेजमधील इनोव्हेशन व स्टार्टअपला पूरक उपक्रमांची माहिती दिली. यावेळेस प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेशित गुणवंत विद्यार्थी तसेच प्रा. संग्रामसिंह पाटील यांचे चिरंजीव ओम यास आयआयटी खड़गपुर येथे प्रवेश मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार आबिटकर यांचे हस्ते करण्यात आला. आबिटकर यांनी तेथील राजर्षी शाहू टेक सेंटरला भेट देवून सोलर पॅनल निर्मिती प्रक्रियेतील सर्व टप्पे प्रात्यक्षिकांसह विद्यार्थी व स्टाफकडून समजावून घेतले. त्यांना एनसीसी कॅडेट्सनी संचलनाने मानवंदना दिली. यावेळेस व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार, माजी महापौर व संचालिका सई खराडे, संचालिका सविता पाटील, सेक्रेटरी मेटील, आजीव सेवक उदय पाटील, माजी रजिस्ट्रार डाॅ. नितीन पाटील, रजिस्ट्रार संदीप पंडे, विभागप्रमुख, स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. मोहन शिंदे तर सूत्रसंचालन प्रा. संग्रामसिंह पाटील यांनी केले.