no images were found
अॅबॉट संपूर्ण भारतातील ७५ प्राथमिक आरोग्य केंद्र अपग्रेड करणार;
२.५ दशलक्ष व्यक्तींना दर्जेदार, सुलभ केअर सेवा उपलब्ध होणार
अॅबॉटने भारतातील नऊ राज्यांमधील ७५ प्राथमिक आरोग्य केंद्रांना (पीएचसी) हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटर्स (एचडब्ल्यूसी) मध्ये अपग्रेड करण्यासाठी अमेरिकेअर्स इंडिया फाऊंडेशनसोबत सहयोग केला आहे. सहा पीएचसी अगोदरच अपग्रेड करण्यात आले आहेत. यामुळे दरवर्षाला महाराष्ट्र, गोवा, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा व झारखंडमधील २.५ दशलक्षहून अधिक व्यक्तींना लाभ होईल.
कोल्हापूर– जागतिक आरोग्यसेवा कंपनी अॅबॉट आरोग्य-केंद्रित मदत व विकास संस्था अमेरिकेअर्स इंडिया फाऊंडेशनसोबत सहयोगाने भारतातील नऊ राज्यांमधील ७५ प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएचसी)हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटर्स (एचडब्ल्यूसी)मध्ये अपग्रेड करण्यासाठी कटिबद्ध आहे. जवळपास २०० दशलक्ष रूपये (२.४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) अॅबॉट अनुदानाचे पाठबळ असलेला एचडब्ल्यूसी उपक्रम दरवर्षी कमी संसाधन असलेल्या समुदायातील २.५ दशलक्षहून अधिक व्यक्तींना सेवा देईल. सरकारच्या आयुष्मान भारत उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी ही केंद्रे अत्यावश्यक आहेत, तसेच ही केंद्रे सर्व व्यक्तींना परवडणारी, दर्जेदार आरोग्यसेवा देतात.
या उपक्रमाची तीन मुलभूत उद्दिष्टे आहेत – स्थानिक पीएचसींना एचडब्ल्यूसींमध्ये अपग्रेड करणे, आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांसाठी क्षमता निर्मितीला चालना देणे आणि एनसीडी व संसर्गजन्य आजारांबाबत सामुदायिक जागरूकता सुधारणे. प्रतिबंध, उपचार व केअर यांबाबत सेवा अधिक प्रमाणात उपलब्ध करून देत अल्प-उत्पन्न असलेल्या व्यक्तींना आरोग्य व स्वास्थ्याबाबत सुधारित जागरूकता, मोठ्या प्रमाणात उपलब्ध व वेळेवर केअर यामधून फायदा होऊ शकतो, ज्यामधून उत्तम आरोग्य निष्पत्तींची खात्री मिळेल.
इतर प्रमुख फोकस क्षेत्रांमध्ये एनसीडी व संसर्गजन्य आजार तपासणी व व्यवस्थापन, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, ऑफ्थॅल्मोलॉजी, विकलांगांसाठी अनुकूल सेवा अशा बाबींचा समावेश आहे. यामधून सर्वांगीण व प्रतिबंधात्मक केअरवर अधिक लक्ष केंद्रित होण्याची खात्री मिळते. अॅबॉटचा प्रमुख संक्रमक व संसर्गजन्य आजारांबाबत जागरूकता सुधारत आणि दर्जेदार आरोग्यसेवा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत लवकर व उपचारासह जीवनशैली उपाय अशा समुदायाच्या आरोग्य-केंद्रित वर्तणूकींना चालना देण्याचा मनसुबा आहे.
हा उपक्रम माता, नवजात बालक, श्वसन आणि डोळ्यांच्या काळजीसाठी ईसीजी मशिन व उपकरणांसह आवश्यक वैद्यकीय साधने प्रदान करेल, तसेच मुख्य पायाभूत सुविधा आणि पाणी, सॅनिटेशन व स्वच्छता (वॉश)हस्तक्षेप प्रबळ करेल. यामध्ये सुरक्षित पिण्याचे पाणी आणि पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र, स्वच्छ शौचालये यांचा समावेश आहे. समुदायांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि पुढील संसर्ग टाळण्यासाठी वॉश (WASH) हस्तक्षेप महत्त्वपूर्ण आहेत.
अॅबॉट आणि अमेरिकेअर्स इंडिया फाऊंडेशन आरोग्यसेवा कर्मचारी, ग्राम आरोग्य स्वच्छता, पोषण समिती (व्हीएचएनएससी) सदस्य व अॅक्रेडिटेड सोशल हेल्थ अॅक्टिवीस्ट (एएसएचए) कर्मचाऱ्यांना एनसीडी व संसर्गजन्य आजारांसह आरोग्य व सुरक्षितता पद्धतींवर ऑन-साइट प्रशिक्षण व क्षमता निर्मिती उपलब्ध करून देत आहेत.