Home Uncategorized शहरात प्लास्टिक वापर व अस्वच्छतेविरोधात महापालिकेची धडक कारवाई

शहरात प्लास्टिक वापर व अस्वच्छतेविरोधात महापालिकेची धडक कारवाई

28 second read
0
0
6

no images were found

शहरात प्लास्टिक वापर व अस्वच्छतेविरोधात महापालिकेची धडक कारवाई:१० दिवसांत १ लाख 63 हजारांचा दंड

कोल्हापूर,  : शहरातील प्लास्टिक वापर, अस्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या दहा दिवसांत विविध प्रकारच्या नियमभंग करणाऱ्यांकडून १ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

            यामध्ये बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्या नागरिक व व्यावसायिकांकडून रु.९२ हजार ५००, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांकडून रु.४७ हजार आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांकडून  रु.२४ हजार असा दंड आकारण्यात आला. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे.

            महापालिकेने गेल्या दहा दिवसांपासून शहरात जनजागृती मोहीमही हाती घेतली असून, नागरिक व व्यावसायिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आणि शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

            आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागाने नागरिक, व्यावसायिक आणि विक्रेत्यांना दैनंदिन कचरा केवळ महापालिकेच्या अधिकृत घंटागाडीतच देण्याचे आवाहन केले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर कचरा जाळणे किंवा कचरा रस्त्यावर अथवा नाल्यात टाकल्यास महाराष्ट्र प्लास्टिक व घनकचरा व्यवस्थापनासंदर्भातील लागू नियम तसेच संबंधित कायद्यांनुसार दंडात्मक कारवाई किंवा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.  

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू.  

डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू.    …