no images were found
थंडी वाढताच चीनमध्ये करोनाचा विस्फोट, देशात पुन्हा लॉकडाऊनचे आदेश
बीजिंग : चीनमध्ये गुरुवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार संसर्गाची साथ सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत करोना संसर्गाच्या आकड्याने उंच्चाक गाठला आहे. चीनमध्ये बुधवारी ३१ हजार ४५४ नवीन रुग्ण सापडले आहेत. ज्यातील २७ हजार ५१७ रुग्णांमध्ये कोणतेही नवीन लक्षणे नाहीयेत. वाढत्या करोना रुग्णांच्या संख्येने चीनमध्ये हाहाकार माजला आहे.
दि. २० नोव्हेंबरला २६ हजार ८२४ रुग्णांची नोंद झाली होती. चीनमध्ये झिरो कोव्हिड पॉलिसी लागू करण्यात आली आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन, चाचण्या आणि कठोर नियमांसाररखी पावलं प्रशासनाने उचलली आहेत. तीन वर्षांपासून चीनमध्ये करोनाचे रुग्ण घटताना दिसत नाहीत म्हणून अधिक कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. मात्र, या कठोर नियमांमुळं चीनी नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहेत. अनेक भागात नागरिक लॉकडाऊनविरोधात प्रदर्शन करत आहेत.
चीनमधील ९२ टक्के लोकांनी करोना प्रतिबंधक लस घेतली आहे.