Home शैक्षणिक डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या एमबीबीएस प्रवेश क्षमतेत ५० जागांची वाढ

डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या एमबीबीएस प्रवेश क्षमतेत ५० जागांची वाढ

15 second read
0
0
5

no images were found

डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या एमबीबीएस प्रवेश क्षमतेत ५० जागांची वाढ

एनएमसीची मंजुरी,यंदापासून २०० विद्यार्थ्यांना प्रवेश;कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांची माहिती

कोल्हापूर(प्रतिनिधी):- डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत नॅशनल मेडिकल कमिशनने (एनएमसी)ने ५० जागांनी वाढ केली आहे. त्यामुळे महाविद्यालयाची प्रवेश क्षमता १५० वरून २०० इतकी झाली आहे. यामुळे अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी दिली.

      महाविद्यालयात आयोजित विशेष समारंभात डॉ. पाटील यांनी ही घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ ए. के. गुप्ता, कुलसचिव डॉ. व्ही व्ही भोसले, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. पाटील यांच्याहस्ते केक कापून हा आनंद साजरा करण्यात आला.

     डॉ. पाटील म्हणाले, १९८९ मध्ये सुरू झालेल्या डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजने आजपर्यंत हजारो गुणवंत डॉक्टर घडविले आहेत. एनएमसीकडून मिळालेली अतिरिक्त ५० जागांची मंजुरी ही संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, सक्षम अध्यापन व्यवस्था आणि आधुनिक आरोग्यसेवेवर ठेवलेल्या विश्वासाची पावती आहे. भविष्यातही जागतिक दर्जाचे वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि रुग्णसेवा यासाठी विद्यापीठ कटिबद्ध राहील.

    विश्वस्त ऋतुराज पाटील म्हणाले, प्रवेश क्षमतेत झालेली वाढ ही संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण, संशोधन संधी आणि उत्कृष्ट क्लिनिकल प्रशिक्षण यावर आणखी भर देऊ.

     विश्वस्त पृथ्वीराज पाटील म्हणाले, एमबीबीएस साठी जागा वाढल्याने अधिक विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची संधी मिळेल. आरोग्यसेवा मजबूत करण्यासाठी यापुढेही अधिक प्राथमिक प्रयत्नशील राहू.

      कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा म्हणाले, गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून डी. वाय. पाटील विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. एमबीबीएसच्या प्रवेश क्षमतेत झालेली वाढ हा विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीतील आणखी एक मैलाचा दगड आहे.

     मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा म्हणाले, एनएमसीने निर्धारित केलेल्या सर्व निकषांची यशस्वी पूर्तता केल्यानंतर ही मंजुरी मिळाली आहे. महाविद्यालयात अत्याधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज अध्यापन सुविधा, आधुनिक रुग्णालय आणि अनुभवी शिक्षकवर्ग उपलब्ध असून शिक्षण, संशोधन आणि रुग्णसेवा या तिन्ही क्षेत्रांत उत्कृष्टता कायम ठेवण्यावर आमचा भर राहील.

         उपअधिष्ठाता डॉ. पद्मजा देसाई यांनी आभार मानले.यावेळी सी. एच आर. ओ. श्रीलेखा साटम, आय क्यू ए सी डायरेक्टर डॉ. शिंपा शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, उप कुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील यांच्यासह विविध संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, विभाग प्रमुख प्राध्यापक उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक
Comments are closed.

Check Also

महाराष्ट्रातील कॅन्सरचा वाढता धोका लक्षात घेता, स्टार हेल्थने कोल्हापूरच्या ॲडव्हायझर्सना कॅन्सर केअरचे ट्रेनिंग दिले

महाराष्ट्रातील कॅन्सरचा वाढता धोका लक्षात घेता, स्टार ह…