no images were found
अनधिकृत पाणी जोडण्या, दुकाने व लॉजिंगवर कठोर कारवाई करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड
कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने राबविलेल्या कारवाईचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी कौतुक करत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. शहरातील पार्किंग व्यवस्था सुधारण्यासाठी तसेच अनधिकृत हातगाड्या, केबिन्स, पाणी जोडण्या, परवाना नसलेली दुकाने व लॉजिंग यांच्याविरोधातील कारवाई सातत्याने सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात झालेल्या विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत आयुक्त डॉ. भारुड यांनी शहरातील विविध विकास प्रकल्प, पाणीपुरवठा, करवसुली, अतिक्रमण निर्मूलन, शिक्षण, उद्याने आणि सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.
बैठकीत हलसवडे येथील सोलर प्रकल्प, मल्टीलेव्हल कार पार्किंग तसेच हॉकी स्टेडियम परिसरातील महापालिकेच्या ताब्यात आलेल्या इमारतीसाठी तातडीने निविदा प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाणीपुरवठा विभागाने गळती दुरुस्तीसोबतच अनधिकृत पाणी जोडण्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करावी, पाईपलाईनला जोडलेल्या मोटारी जप्त कराव्यात तसेच शहरातील गळती दुरुस्तीसाठी वार्षिक एजन्सी नियुक्त करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. परवाना न घेता सुरू असलेली दुकाने, लॉज, मिळकती सील करण्यासाठी घरफाळा व परवाना विभागाने संयुक्त मोहीम राबवावी. अधिकृत फेरीवाल्यांना जीपीएस आधारित क्यूआर ओळखपत्र देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच परवाना व अग्निशमन विभागाने संयुक्तपणे लॉजिंग व खासगी क्लासेसची तपासणी करुन विना परवाना आस्थापनांवर सीलची कारवाई करण्याचे आदेश दिले जेणेकरून कोणतीही संभाव्य दुर्घटना टाळता येतील.
यावेळी अतिरिक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, डॉ.विजय पाटील, राम काटकर, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनील बिद्री, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, निवास पोवार, अरुणकुमार गवळी, सहा.अभियंता नारायण पुजारी, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, रवका अधिकारी प्रशांत पंडत, विधी अधिकारी संदीप तायडे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंह रजपूत, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे उपस्थित होते.