no images were found
जुन्या गुंतवणुकीत अडकलेले ₹४ लाख कोटी; गुंतवणूकदारांना हक्काची मालमत्ता परत मिळवून देण्यासाठी क्लिअरक्लेमचा पुढाकार
कोल्हापूर : देशभरात सुमारे ₹४ लाख कोटींचे शेअर्स, लाभांश आणि इतर आर्थिक मालमत्ता विविध कारणांमुळे निष्क्रिय किंवा दावा न झालेल्या अवस्थेत आहेत. जुनी शेअर प्रमाणपत्रे हरवणे, नोंदी अद्ययावत न करणे किंवा वारसांना गुंतवणुकीची माहिती नसणे यामुळे अनेक गुंतवणूकदार आपल्या हक्काच्या मालमत्तेपासून वंचित राहतात.
या समस्येवर उपाय म्हणून पुणेस्थित क्लिअरक्लेम (Clearclaim) कंपनी गुंतवणूकदारांना जुन्या गुंतवणुकीचा शोध घेऊन ती परत मिळवून देण्यासाठी मदत करत आहे. कंपनीकडून जुने शेअर्स व लाभांश मिळवून देणे, भौतिक शेअर्सचे डीमॅटमध्ये रूपांतर, मालकी हस्तांतरण, डुप्लिकेट शेअर प्रमाणपत्रे आणि IEPF दावे दाखल करण्यासाठी सहाय्य केले जाते.
क्लिअरक्लेमच्या माहितीनुसार, कंपनीने आतापर्यंत ₹५० कोटींपेक्षा अधिक किमतीचे शेअर्स आणि लाभांश गुंतवणूकदारांना परत मिळवून देण्यासाठी मदत केली असून, एक हजारांहून अधिक डीमॅट आणि IEPF दावे दाखल केले आहेत.