no images were found
शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात माऊलींचे स्वागत…
संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आज पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश झाला. यावेळी माऊलींच्या स्वागतासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव उपस्थित होते. पालखीच्या स्वागतानंतर दोघेही वारीमध्ये सहभागी झाले. वारीमध्ये दरवर्षीप्रमाणे शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आरोग्य, स्वच्छता, वृक्षारोपण, वारकरी सेवा इत्यादी सेवाभावी कार्यासाठी सहभागी झालेले आहेत.