Home Uncategorized केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाची ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांनी केली पाहणी

केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाची ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांनी केली पाहणी

37 second read
0
0
12

no images were found

केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाची ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांनी केली पाहणी

कोल्हापूर,  : केशवराव भोसले नाट्यगृहाच्या सुरू असलेल्या पुनर्बांधणी कामाची ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांनी आज सकाळी प्रत्यक्ष पाहणी करून कामाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी नाट्यगृहातील विविध कामांची सविस्तर माहिती घेत आधुनिक सुविधा, सुरक्षितता आणि प्रेक्षकांच्या सोयींवर विशेष भर देण्याच्या सूचना केल्या.

            भरत जाधव यांनी नाट्यगृहातील स्टेज ले-आऊट, अत्याधुनिक साऊंडसिस्टीम, प्रकाशयोजना, आसनव्यवस्था तसेच इतर तांत्रिक बाबींची विशेष माहिती घेतली. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना गरजेचे असून, भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रेक्षकांच्या प्रवेश व निर्गमनासाठी स्वतंत्र आणि सुरक्षित व्यवस्था असावी, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. नाट्यगृहाचे काम युद्धपातळीवर सुरू असून दर्जेदार पद्धतीने कामाची अंमलबजावणी होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

            यानंतर भरत जाधव यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी त्यांचे पुस्तक देऊन स्वागत केले. भेटीदरम्यान केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाच्या प्रगतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

            यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, सहाय्यक अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता अनुराधा पांढरे, व्यवस्थापक समीर महाब्री तसेच स्ट्रकवेल कंपनीचे सल्लागार राजेश यादव उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

अनधिकृत पाणी जोडण्या, दुकाने व लॉजिंगवर कठोर कारवाई करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

अनधिकृत पाणी जोडण्या, दुकाने व लॉजिंगवर कठोर कारवाई करा : आयुक्त डॉ. र…