Home राजकीय अन्नधान्य,खाद्यन्नावर जीएसटी नकोच-अँड.संदीप ताजने

अन्नधान्य,खाद्यन्नावर जीएसटी नकोच-अँड.संदीप ताजने

8 second read
0
0
84

no images were found

अन्नधान्य,खाद्यन्नावर जीएसटी नकोच-अँड.संदीप ताजने

मुंबई : आधीच बेरोजगारी,महागाईने होरपळलेल्या जनतेला दिलासा देण्याऐवजी त्यांच्यावर करस्वरुपी ओझं लादण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार करीत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू डाळ, गहू, मोहरी, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, लस्सी आणि इतर खाद्यवस्तूंच्या लेबलयुक्त तसेच पॅकेजिंग वर जीएसटी आकारला जावू नये, अशी आग्रही मागणी बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी गुरूवारी केली. जीएसटीचे अतिरिक्त ओझ सर्वसामान्यांच्या खांद्यावर लादले गेले आहे. हे ओझ कमी करण्यासाठी वेळ पडल्यास सरकार विरोधात रस्तावर उतरू, असा इशारा अँड.ताजने यांनी दिला आहे.

तांदूळ, गहू, पीठ, दही, पनीर या घरात रोज लागणार्‍या वस्तू आहेत. याच वस्तूंच्या दरांमध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्यांची मोठी अडचण झाली आहे. कोरोना संकटानंतर एकीकडे नोकर्‍या, रोजगारात घट झाली आहे.तर दुसरीकडे महागाईत दिवसेंदिवस भर पडत आहे. महागाईचे गणित सोडवत अतिशय काटकसर करत सर्वसामान्यांना त्यामुळे जगावे लागत आहे.जीएसटीमुळे सर्वसामान्यांच्या संकटात वाढ झाली आहे.

अन्नधान्य आणि खाद्यपदार्थांवर ५% जीएसटी लावण्यात आला आहे. खाद्य अन्न व अन्नधान्यांवरील भाववाढ असहाय्य होणारी आहे.सरकारने एकीकडे इंधनाचे दर कमी केले आणि दुसरीकडे खाद्यन्न महाग केले हे धोरण चुकीचे आहे. सरकारचे हे वर्तन सर्वसामान्यांचे जगणे कठीण करणारे आहे. वाढत्या जीएसटीचा फटका सर्वसामान्यांसह व्यापारी तसेच शेतकर्‍यांनाही बसत आहे. जीएसटीची वाढ महागाईत मोठी भर टाकणारी आहे, अशी भावना अँड.ताजने यांनी व्यक्त केली.

घरात लागणार्‍या बहुतांश वस्तूंवर जीएसटी आकारण्यात आला असल्याने महागाईत वाढीव जीएसटीच्या रूपाने मोठी भर पडली आहे.या महिन्यांपासून किराणा मालाचे पैसे वाढणार आहेत.वाढलेल्या जीएसटीचा बोजा सर्वाधिक ग्राहकांच्या खिशावर पडेल.त्यामुळे सर्वसामान्यांचे घरखर्चाचे नियोजन कोलमडले आहे. घरात लागणार्‍या वस्तूंचे दर वाढल्याने घरखर्चातही ५ ते १० टक्क्यांनी वाढ होईल. जीएसटीचा फटका व्यापारी तसेच शेतकर्‍यांनाही बसेल अशी भावना देखील अँड.ताजने यांनी व्यक्त केली आहे.

Load More Related Articles

Check Also

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम कोल्हापूर/ प्रतिनिधी:-…