Home Uncategorized प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना : विशेष शिबिरांचे आयोजन

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना : विशेष शिबिरांचे आयोजन

6 second read
0
0
6

no images were found

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना : विशेष शिबिरांचे आयोजन

कोल्हापूर, : प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांचे कर्ज मागणीचे अर्ज विविध कारणांमुळे बँकांकडे प्रलंबित आहेत अथवा बँकांनी नामंजूर केले आहेत अशा लाभार्थ्यांच्या कर्ज मागणी अर्जाचे पुनरावलोकन, पडताळणी व आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी लिड डिस्ट्रिक्ट मॅनेजर (LDM) यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील सर्व बँका, MSME DFO आणि खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

सप्टेंबर 2023 मध्ये योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 15 हजार 521 कारागीरांना विश्वकर्मा म्हणून मान्यता देण्यात आली असून तसे प्रमाणपत्र त्यांना वितरीत करण्यात आले आहे. 11 हजार 246 कारागीरांना त्यांच्या कारागिरीनुसार प्रशिक्षण देण्यात आले असून प्रत्येकी 4 हजार रूपये इतका स्टायपेंड त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे. 7 हजार 935 इतक्या कारागीरांना रूपये 15 हजार पर्यंतचे त्यांच्या उद्योगानुसार टूलकिट वाटप करण्यात आले आहे. 3 हजार 226 कारागीरांची कर्ज प्रकरणे मंजूर केली असून त्यांना 31.80 कोटी इतके कर्ज वाटप करण्यात आले आहे.

428 कारागीरांची कर्ज प्रकरणे बँकांकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत असून लवकरच या प्रकरणांना मंजुरी मिळण्याकामी तसेच ज्या कारागीरांची कर्ज प्रकरणे नामंजूर करण्यात आली आहेत अशा कारागीरांना लवकरात लवकर कर्ज मंजूर करून वाटप करण्याकरीता केंद्र सरकारच्या सुचनांनुसार जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी एकूण 5 शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या कारागिरांची नोंदणी प्रक्रिया पुर्ण झाली असून त्यांना विश्वकर्मा म्हणून केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे असेच विश्वकर्मा कारागिर हे या शिबीरांकरीता पात्र आहेत. एकूण 5 शिबीरांपैकी 3 शिबीरे पुर्ण झाली असून त्याचा प्रतिसाद पाहता उर्वरित 2 शिबीरांमध्ये वर उल्लेख केल्याप्रमाणे पात्र विश्वकर्मा कारागिरांनी सहभागी होवून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. कोल्हापूर शहर (जिल्हा उद्योग केंद्र- DIC कार्यालय हॉल) – 13 जुलै व गारगोटी (तुलसी लॉन)- 14 जुलै रोजी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत कर्ज प्रकरणाकरीता आवश्यक कागदपत्रे- आधार कार्ड, पीएम विश्वकर्मा अर्ज क्रमांक / नोंदणी तपशील, बँक पासबुक, प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र (Training Certificate) व इतर आवश्यक कागदपत्रे.

या आगामी शिबिरांमध्ये विश्वकर्मा म्हणून केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे अशा पात्र लाभार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर (LDM) व जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफतर्फे अल्पकालीन आर्थिक जबाबदाऱ्यांसाठी खास तयार केलेला 10 वर्षांचा जीवन विमा संरक्षण प्रस्ताव सादर

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफतर्फे अल्पकालीन आर्थिक जबाबदाऱ्यांसाठी खास तयार केलेला 10…