Home उद्योग अदाणी ग्रीन एनर्जीने 20 गीगावॅट कार्यरत वीज निर्मिती क्षमतेचा टप्पा पार केला

अदाणी ग्रीन एनर्जीने 20 गीगावॅट कार्यरत वीज निर्मिती क्षमतेचा टप्पा पार केला

26 second read
0
0
18

no images were found

अदाणी ग्रीन एनर्जीने 20 गीगावॅट कार्यरत वीज निर्मिती क्षमतेचा टप्पा पार केला

भारतातील युटिलिटी- स्केल सौर ऊर्जा क्षमतेत सुमारे 14% आणि सौर- पवन ऊर्जा क्षमतेत सुमारे 12% वाटा

अहमदाबाद, : भारतातील सर्वात मोठी नवीकरणीय ऊर्जा कंपनी अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड (एजीईएल) ने 20 गिगावॅट कार्यरत नवीकरणीय ऊर्जा क्षमतेचा टप्पा ओलांडला आहे. प्रामुख्यानेग्रीनफिल्ड प्रकल्पांच्या माध्यमातून हा टप्पा गाठणारी एजीईएल ही भारतातील पहिली नवीकरणीय ऊर्जा कंपनी ठरली आहे. कंपनी दरवर्षी 52 अब्ज युनिट्सपेक्षा अधिक स्वच्छ वीज निर्मिती करते. ही वीज भारताच्या एकूण वीज वापराच्या जवळपास 3 टक्के आहे. या ऊर्जेवर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराला वर्षभर वीजपुरवठा करता येईल किंवा मुंबई आणि नवी दिल्ली या दोन्ही शहरांच्या जवळपास संपूर्ण वीज गरजा भागवता येतील.

2016 मध्ये तामिळनाडूतील कामुथी येथे पहिला नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प सुरू केल्यानंतर अवघ्या दहा वर्षांत एजीईएल ने हा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे ग्रीनफिल्ड प्रकल्पांच्या माध्यमातून सर्वाधिक आणि सर्वात वेगाने नवीकरणीय ऊर्जा क्षमता विकसित करणारी भारतातील कंपनी म्हणून एजीईएल ने नवा विक्रम केला आहे. आर्थिक वर्ष 2025-26 (FY26) मध्ये कंपनीने 5,051 मेगावॅट नवीन नवीकरणीय ऊर्जा क्षमता कार्यान्वित केली. चीनबाहेरील कोणत्याही कंपनीने एका वर्षात केलेली ही सर्वाधिक नवीकरणीय ऊर्जा क्षमता वाढ आहे.

या महत्त्वाच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे एग्जीक्यूटिव डायरेक्टर सागर अदाणी म्हणाले, “20 गिगावॅट कार्यान्वित क्षमतेचा टप्पा ओलांडणे हे नियोजनबद्ध अंमलबजावणी आणि दीर्घकालीन दूरदृष्टीचे यश आहे. आमची सक्षम टीम आणि दीर्घकाळापासूनचे भागीदार यांच्या सहकार्यामुळे एजीईएल आज मुंबई आणि नवी दिल्ली या दोन्ही शहरांच्या एकत्रित वार्षिक वीज गरजांइतकी नवीकरणीय वीज निर्माण करत आहे. यामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा अधिक मजबूत होत असून स्वच्छ ऊर्जा क्षेत्राकडे होणाऱ्या संक्रमणालाही गती मिळत आहे.”

लंडन क्लायमेट ॲक्शन वीक दरम्यान 26 जून रोजी लंडनमधील सायन्स म्युझियममध्ये आयोजित पहिल्या अदाणी ग्रीन एनर्जी डायलॉगमध्ये सागर अदाणी यांनी केलेल्या भाषणानंतर हे यश मिळाले आहे. या कार्यक्रमात, त्यांनी ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी, वीज अधिक परवडणारी बनवण्यासाठी आणि चोवीस तास विश्वसनीय स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बॅटरी स्टोरेजसह नवीकरणीय ऊर्जेवर आधारित विद्युतीकरणाला गती देण्याच्या गरजेवर भर दिला.

ही वाढ भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी आणि सर्वात वेगाने झालेली नवीकरणीय ऊर्जा क्षमता वाढ मानली जाते. एजीईएलच्या कार्यरतप्रकल्पांमध्ये सुमारे 14.2 गिगावॅट सौर ऊर्जा, 2.7 गिगावॅट पवन ऊर्जा आणि 3.3 गिगावॅट पवन-सौर हायब्रिड ऊर्जा क्षमता समाविष्ट आहे. याशिवाय, कंपनीने 3.55 गिगावॅट-तास क्षमतेची बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रणाली (BESS) कार्यान्वित केली आहे. चीनबाहेरील हा जगातील सर्वात मोठा BESS प्रकल्प असून, जगातील सर्वात वेगाने पूर्ण झालेल्या प्रकल्पांपैकी एक आहे.

याबाबत सागर अदाणी म्हणालेभारतातील वीज निर्मितीत नवीकरणीय ऊर्जेचा वाटा वाढत असताना, विश्वासार्ह आणि गरजेनुसार उपलब्ध होणारी स्वच्छ वीज पुरवण्यासाठी बॅटरी ऊर्जा साठवणूक अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. कंपनीचे उद्दिष्ट आर्थिक वर्ष 2026-27 (FY27) मध्ये 10 गिगावॅट-तासबॅटरी साठवणूक क्षमता वाढवण्याचे असून, पुढील पाच वर्षांत ती 50 गिगावॅट-तासांपर्यंत नेण्याची योजना आहे. यामुळे 2030 पर्यंत 50 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमता उभारण्याच्या कंपनीच्या उद्दिष्टाला बळ मिळणार आहे.

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील खावडा हा एजीईएल च्या पुढील वाढीचा मुख्य केंद्रबिंदू असून, येथे जगातील सर्वात मोठा नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे. 538 चौ. कि.मी. क्षेत्रात पसरलेल्या या प्रकल्पाची नियोजित क्षमता 30 गिगावॅट आहे. हे क्षेत्र पॅरिस शहराच्या सुमारे पाच पट आणि मुंबईच्या जवळपास एवढ्या आकाराचे आहे. या ठिकाणी एजीईएल ने आतापर्यंत 9.5 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमता कार्यान्वित केली असून, ती प्रकल्पाच्या नियोजित क्षमतेच्या 30 टक्क्यांहून अधिक आहे.

 
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

कलाकारांनी वर्ल्ड चॉकलेट डे निमित्त त्यांच्या गोड चॉकलेट प्रेमाच्या आठवणी शेअर केल्या

कलाकारांनी वर्ल्ड चॉकलेट डे निमित्त त्यांच्या गोड चॉकलेट प्रेमाच्या आठवणी शेअर केल्या मुंब…