Home Uncategorized राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी सामाजिक कार्याचे व्रत अखंडीत जोपासू : आमदार राजेश क्षीरसागर

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी सामाजिक कार्याचे व्रत अखंडीत जोपासू : आमदार राजेश क्षीरसागर

0 second read
0
0
8

no images were found

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी सामाजिक कार्याचे व्रत अखंडीत जोपासू : आमदार राजेश क्षीरसागर

राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने अभिवादन

कोल्हापूर  : सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, लोककल्याणकारी राजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. सकाळी दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी “जय भवानी जय शिवाजी”, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, समाजातील प्रत्त्येक घटकाला न्याय मिळावा, वंचितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजात समता, बंधुता टिकविण्याची सर्वांची जबाबदारी आहे. बहुजनांना शिक्षण, स्त्रीउद्धार, जातीभेदांचा नाश करण्यासाठी झटणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज सर्वसमावेशक विकासाचे प्रेरणास्त्रोत्र आहेत. अलौकिक प्रतिभा आणि त्यागातूनच महाराज राजर्षी झाले. आज महाराजांच्या विचाराने देशाची वाटचाल होणे गरजेचे आहे. त्यांच्या कार्याचा वसा जगभरात पोहचविण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे अनुयायी होवून त्याविचारानुसार समाजकार्य करणे ही आपली जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख, महिला व बालकल्याण सभापती कौसर बागवान, नगरसेविका मंगल साळोखे, नगरसेवक आस्कीन आजरेकर, महिला आघाडीच्या शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख अमरजा पाटील, पूजा भोर, पूजा पाटील, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष दीपक चव्हाण, कमलाकर जगदाळे, रणजित मंडलिक, तुकाराम साळोखे, राहुल चव्हाण, अनिल पाटील, विनय वाणी, अंकुश निपाणीकर, अल्लाउद्दिन नाकाडे, मंदार पाटील, गजानन भुर्के, श्रीकांत मंडलिक, प्रशांत नलवडे, किरण अतिग्रे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचे लोकार्पण

पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भव…