no images were found
‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि त्यांवरील उपाययोजना यांवर इचलकरंजी येथे २७ जूनला विशेष व्याख्यान !
इचलकरंजी – महाराष्ट्रात सातत्याने ‘लव्ह जिहाद’ची धक्कादायक नवी प्रकरणे उघडकीस येत आहेत. अमरावती येथे अयान अहमदने १८० मुलींचे शारीरिक शोषण करून त्यांची आक्षेपार्ह छायाचित्रे समाजमाध्यमांत टाकल्याची घटना असो, की कोल्हापुरात ठराविक कालावधीनंतर समोर येणारी अशीच इतर प्रकरणे असोत, सद्यस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि हिंदू समाजाला या धोक्यापासून सावध करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. महेंद्र अहिरे यांनी दिली. या प्रसंगी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हा विशेष संपर्क प्रमुख श्री. संतोष हत्तीकर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री. दत्ता पाटील, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद ओजस्विनी जिल्हाध्यक्ष सौ. अंजली पोळ, शिवसेना जिल्हा संघटक श्री. मोहन मालवणकर, हिंदु महासभेचे श्री. संजय कुलकर्णी, उद्योजक श्री. दिलीप पटेल, हिंदुत्वनिष्ठ श्री. आनंदा मकोटे उपस्थित होते.
हे व्याख्यान शनिवार, २७ जून या दिवशी सायंकाळी ५.३० जिव्हाजी सांस्कृतिक भवन, इचलकरंजी येथे पार पडणार आहे. या व्याख्यानात प्रामुख्याने सर्वप्रथम ‘लव्ह जिहाद’ या विषयावर ग्रंथ लिहिणारे लेखक तथा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, तसेच सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये उपस्थितांना या विषयाचे गांभीर्य आणि त्यावरील उपाययोजना यांविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
‘टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस’ मधील ‘कॉर्पोरेट जिहाद’चे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आज हजारो पालक त्यांच्या मुलींच्या भविष्याविषयी प्रचंड चिंतेत आहेत. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे दोन भाग प्रसिद्ध होऊनही हिंदू समाज या संकटाविषयी अजूनही तितकासा जागृत झालेला दिसत नाही. अशी एकामागून एक अनेक प्रकरणे समोर येत असताना आपण आताच जागे झालो नाही, तर उद्या आपल्याही घरात अशी दुर्दैवी घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि या छुप्या संकटाचा सामना कसा करावा, हे समजून घेण्यासाठी सर्व हिंदू बांधव, युवती, माता-भगिनी आणि विशेषतः पालकांनी त्यांच्या मुलींना सोबत घेऊन या व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.