no images were found
रोटरी सेंट्रलचे डॉ.शेंडगे प्रेसिडेंट तर अविनाश चिकनिस सेक्रेटरी
कोल्हापूर (प्रतिनिधी):रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे प्रेसिडेंट म्हणून डॉक्टर भूषण शेंडगे आणि सेक्रेटरी म्हणून उद्योजक अविनाश चिकनीस यांनी पदभार स्वीकारला. ज्येष्ठ रोटेरियन सी.एम .बेंद्रे यांच्या हस्ते पदग्रहण सोहळा झाला.
यावेळी बोलताना श्री.बेंद्रे यांनी रोटरीच्या माध्यमातून माणुसकी जपत समाजातील विविध घटकांना मदत करण्याबरोबरच त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
मावळते प्रेसिडेंट अभिजीत भोसले यांनी गेल्या वर्षभरातील उपक्रमांची माहिती दिली.नूतन प्रेसिडेंट डॉ.शेंडगे यांनी आपल्या कार्यकाळात सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला.
सेक्रेटरी अविनाश चिकनिस यांनी आभार मानले.
रवी खोत, आर. वाय.पाटील यांचा उत्कृष्ट रोटेरियन म्हणून सत्कार करण्यात आला.यावेळी असिस्टंट गव्हर्नर अभयसिंह बिचकर, संजय साळोखे, नीलेश पाटील यांच्यासह रोटेरियन आणि कुटुंबीय उपस्थित होते.सूत्रसंचालन संदीप साळोखे यांनी केले.